britain 
ग्लोबल

ब्रिटनचे प्रिंस हॅरी आणि मेगन मर्केल यांची गुड न्यूज; दुसऱ्यांदा होणार आई-वडील

सकाळवृत्तसेवा

लंडन : ब्रिटनचे प्रिंस हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मर्केल यांना दुसऱ्यांना बाळ होणार आहे. व्हँलेंटाईन डेला त्यांच्या प्रवक्त्यांनी ही आनंदाची बातमी जाहीर केली आहे. या दाम्पत्याने एक ब्लॅक एँड व्हाईट फोटो जाहीर केला आहे, ज्यामध्ये एका झाडाखाली दोघेही हसऱ्या मुद्रेत दिसत आहेत. यामध्ये 39 वर्षाच्या मर्केल या गर्भवती असल्याचं दिसत आहे. त्यांच्या प्रवक्त्यांनी मोठ्या मुलाचा संदर्भ देत म्हटलंय की, आर्ची मोठा भाऊ बनणार आहे. आता हे दाम्पत्य आपल्या दुसऱ्या मुलाच्या आशेने अत्यंत आनंदीत आहे. 

मेगन आणि 36 वर्षीय हॅरी जे महाराणी एलिझाबेथ यांचे दुसरे नातू आहेत, त्यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये फ्रंटलाइन रॉयल ड्यूटी सोडून दिली होती आणि आता ते कॅलिफॉर्नियात राहतात.

गेल्या वर्षी जानेवारीमध्येच प्रिंस हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मर्केल यांनी ड्यूक ऑफ ससेक्स आणि डचेस ऑफ ससेक्सची शाही उपाधी सोडण्याची घोषणा केली होती. याआधी या दाम्पत्याने मे 2019 मध्ये एका मुलाला जन्म दिला होता, ज्याचं नाव आर्ची आहे. प्रिस हॅरी आणि मेगन मर्केल मे 2018 मध्ये विवाहबद्ध झाले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT