Lucy Letby Case eSakal
ग्लोबल

Lucy Letby Case : अखेर न्याय मिळाला! 7 बाळांच्या हत्येप्रकरणी ब्रिटिश नर्सला जन्मठेपेची शिक्षा

सकाळ डिजिटल टीम

British nurse Lucy Letby imprisoned for life

नवी दिल्ली- सात नवजात बालकांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या महिलेला कोर्टाने आजन्म तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ब्रिटेनमध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या महिलेने नुकत्याच जन्मलेल्या सात बाळांची हत्या केली होती, तर सहा जणांच्या हत्येचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी मँचेस्टरच्या क्राउन कोर्टाने सोमवारी निर्णय दिला असून आजन्म तुरुंगवासाची शिक्षा सुनावलीये.

लुसी Lucy Letby, ३३ असं महिला नर्सचे नाव आहे. लुसीच्या गुन्ह्याची क्रूरता लक्षात घेता कोर्टाने ही शिक्षा सुनावली. तसेच कोणत्याही प्रकारच्या जामीन देण्याला नकार दिला आहे. कोर्टाने यावेळी म्हटलं की, महिलेला आपल्या कृत्याबद्दल काहीही पश्चाताप नाही. तसेच तिने आपला गुन्हा नाकारलेला नाही. त्यामुळे तिच्या शिक्षेमध्ये सूट देण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही.

लुसीला पकडून देण्यात भारतीय वंशाच्या डॉक्टरने महत्त्वाची भूमिका बजावली होती.पोलिसांना लुसीच्या घरी विविध प्रकारच्या नोट्स लिहिलेल्या आढळल्या होत्या. यातील बहुतांश नोट्समध्ये 'मी सैतान आहे.' असं लिहिलेलं दिसून आलं होतं. कोर्टाने तिला याआधीच दोषी ठरवलं होतं. सोमवारी याचा निकाल येणार होता.

लुसी नर्सने काही बाळांना हवेचं, इन्सुलिनचं इंजेक्शन देऊन मारलं. तर, काहींना अधिक प्रमाणात दूध पाजून आणि काहींना मारहाण करून त्यांची हत्या केली. तिने अशा प्रकारे सात बाळांचा जीव घेतला आणि इतर सहा बाळांची हत्या करण्याचा प्रयत्न केला; मँचेस्टरच्या क्राउन कोर्टात सांगण्यात आलं.

कधीचं आहे प्रकरण?

हे प्रकरण 2015-16 सालचं आहे. या एका वर्षामध्ये लुसीने 13 बाळांच्या हत्येचा प्रयत्न केला होता. ती काउंटीज ऑफ चेस्टर रुग्णालयात काम करत होती. बाळांची हत्या करून, हे मृत्यू नैसर्गिकरित्या होत असल्याचं तिला दाखवायचं होतं, असं वकीलांनी सांगितलं. या प्रकरणी शुक्रवारी तिला दोषी ठरवण्यात आलं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT