Bacteria Collection esakal
ग्लोबल

Bacteria Collection : जगातील सर्वात जीवघेणे बॅक्टेरिया आहेत 'या' इमारतीमध्ये स्टोअर

जेवढे शोध व्हायरसवर लावले जातात तेवढे बॅक्टेरियावर लावले जात नाहीत. कारण बरेचसे बॅक्टेरिया लॅबमध्ये विकसित होत नाहीत.

सकाळ डिजिटल टीम

A Building Wich Has Collection of Bacterias : जगभरात वेगवेगळ्या आजारांच्या साथी येत असतात. बऱ्याचदा त्या एखाद्या व्हायरसमुळे येतात किंवा बॅक्टेरियामुळे. त्यावर संशोधन करून त्याची लस किंवा औषध शोधलं जातं. तोपर्यंत त्या आजारात अनेकांचा बळी गेल्याचा आपला अनुभव आहे.

जेवढे शोध व्हायरसवर लावले जातात तेवढे बॅक्टेरियावर लावले जात नाहीत. कारण बरेचसे बॅक्टेरिया लॅबमध्ये विकसित होत नाहीत. त्यामुळे त्यांची साठवणूर करून अभ्यास करणं शक्य होत नाही. पण ब्रिटनमध्ये अशी एक इमारत आहेत जिथं १०० वर्षांपेक्षाही जास्त काळापासून बॅक्टेरियांची साठवण केली जात आहे.

पहिल्या विश्व युध्दाच्या सुरूवातीला जेव्हा ब्रिटीश सैनिक सारखे आजारी पडू लागले आणि पटापट मृत्यू होऊ लागले. त्यावेळी सर्व सैनिकांचे लक्षणं सारखेच होते. पोटदुखी, ताप, डोकेदुखी, पोट खराब होणं आणि मग तब्येत अधिक बिघडत जात हाताबाहेर जाणं.

युध्दातल्या वैज्ञानीकांनी सुरवात केली

यावेळी वैज्ञानिक, डॉक्टर सर्वच कामाला लागलेले होते. तिथं एक बॅक्टिरियोलॉजिस्ट विलियम एलकॉकने आजारी सौनिकाच्या शरीरातल्या बॅक्टेरीयाचं सँपल घेतलं. एका खास प्रकारच्या लाकडी बॉक्समध्ये भरून त्यावरून पॅराफीन वॅक्सने डब्बा सील केला. हा पहिलाच सँपल होता. युध्द संपेपर्यंत या बॅक्टेरियासह अजून काही बॅक्टेरियाजला लिस्टर इंस्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसीनमध्ये ठेवला गेला. इथं आजवर २०० सँपल झाले आहेत. हळूहळू अभ्यासासाठी इतर देशांमधूनपण इथं सँपल येऊ लागले.

त्यावेळी सुरक्षेच्या एवढ्या सोयी नव्हत्या

या जीवघेण्या बॅक्टेरियाजला फक्त अगारवूड डब्ब्यात ठेऊन पॅराफीनने सीलबंद केलं जात होतं. त्यावर बॅक्टेरियाविषयीची माहिती लिहिली जात असे. ते डब्बे बोटीतून पाठवले जात आणि याची माहिती कॅप्टनपासून इतर जबाबदार लोकांना दिली जात. म्हणजे चुकूनही कोणी डबे विसरू नये.

इमारतीवर बॉम्ब हल्ला

बॅक्टेरियावर शोध सुरू असतानाच दुसरं महायुध्द सुरू झालं. यात या इमारतीचा एक मोठा भाग बॉम्ब हल्ल्यात उद्ध्वस्त झाला. तेंव्हा पूर्ण दक्षता घेत बॅक्टेरिया कलेक्शन लंडनच्या दुसऱ्या भागात हलवण्यात आलं. याला नॅशनल कलेक्शन ऑफ टाइप कल्चर्स असं नाव देण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update: बारामतीत करुणा मुंडे -बिचुकलेंना किती मते मिळाली? नोटाला किती?

Infrastructure Success: ऋतुजा नागटिळक-ढोक ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात चमकली; जगातील लांब बोगदा प्रकल्पात महत्त्वाची भूमिका, बहुराष्ट्रीय कंपनीत मॅनेजर!

Chhatrapati Sambhajinagar: अफवांमुळे गॅस बुकिंगसाठी ग्राहकांची ऑनलाइन झुंबड;सोशल मीडियावर फिरताहेत दरवाढीचे मेसेज

IPL 2026: हार्दिक, सूर्यकुमारच्या फॉर्मवर लक्ष; मुंबई लखनौमध्ये आज लढत, तळाच्या संघांमध्ये झुंज, पाहा कशी असेल Playing XI

PAN Rule: आता या कामांसाठी PAN कार्ड बंधनकारक! Form 60 बंद, Form 97 लागू; जाणून घ्या पॅनचे नवे नियम

SCROLL FOR NEXT