Donald Trump sakal
ग्लोबल

Donald Trump : ट्रम्प यांच्यावर झाडलेली गोळी कॅमेऱ्यात कैद

अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर रविवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यातून ते सुखरूप बचावले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

शिकागो : अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर रविवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यातून ते सुखरूप बचावले आहेत. हल्लेखोऱ्याने ट्रम्प यांच्या दिशेने झाडलेली गोळी डग मिल्स यांच्या एका छायाचित्रात दिसत आहे. हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

मिल्स हे ‘द न्यूयॉर्क टाइम्स’चे वरिष्ठ छायाचित्रपत्रकार आहेत. पेनसिल्व्हानियामधील बटलर टाऊन येथे प्रचारसभेत ट्रम्प बोलत असतानाच हल्लेखोराने रायफलच्या साह्याने गोळ्या झाडल्या. त्यावेळी सभेचे छायाचित्र काढण्यासाठी अनेक छायाचित्रकार व्यासपीठानजीक उभे होते.

मिल्स छायाचित्र काढीत असताना ट्रम्प यांच्या दिशेने आलेल्या गोळीचे छायाचित्र कॅमेऱ्यात कैद झाले. ‘‘मला त्याच्या चेहऱ्यावर रक्त दिसत होते. मी छायाचित्र काढत राहिलो. मी पूर्वी कधी गोळीबाराचा आवाज ऐकला नव्हता.

त्यामुळे काय चालले आहे हे समजले नाही. पण गोंधळ वाढला होता. ट्रम्प खाली झुकले व ‘सिक्रेट सर्व्हिस’च्या सदस्यांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली, तेव्हा त्यांच्यावर गोळीबार झाल्याचे लक्षात आले,’’ असे मिल्स म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT