Chabhar Port
Chabhar Port  Google
ग्लोबल

चाबहार बंदर : भारताने केलं 'पाक'ला बायपास, शोधला नवा मार्ग

निनाद कुलकर्णी

अफगाणिस्तान (Afganistan) आणि मध्य आशियापर्यंत पोहोचण्यासाठी भारत आणि इराण सातत्याने (India Iran Relationship) एकत्र काम करत आहेत. दरम्यान, आता इराणमधील चाबहार (Iran Chabahar Port) बंदरातून न्हावा शेवा आणि कांडला दरम्यान थेट कंटेनर शिपिंग मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गाने पहिली कंटेनर सेवा 16 फेब्रुवारीला इराणच्या शाहिद बेहेश्ती बंदरात दाखल होणार आहे. (India Found New Rout For Chabahar Port)

चाबहार बंदरातून भारताकडून पाकिस्तान बायपास

अफगाणिस्तान आणि पर्शियन आखातातील देश तसेच मध्य आशियातील देशांना माल पाठवण्यासाठी भारत या शिपिंग (Shipping Rout For Chabahar Port) मार्गांचा वापर करत आहे. दरम्यान, या सर्वामध्ये चाबहार बंदराच्या माध्यमातून भारत पाकिस्तानला (India Bypass Pakistan For Chabahar Port) बायपास करून अफगाणिस्तान आणि मध्य आशियामध्ये मालाची वाहतूक करत आहे. तसेच यामुळे अफगाणिस्तानलाही एक प्रकारे समुद्रात (See Rout For Chabahar Port) प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.

भारत चाबहारमधील (Chabahar Port) शहीद बेहेश्ती बंदरावर मोबाईल हार्बर क्रेनसह आधुनिक लोडिंग आणि अनलोडिंग उपकरणांची स्थापना आणि ऑपरेशनचे काम पाहत असून, मध्य आशियाई देशांसोबत दळणवळण मार्ग विकसित करण्यासाठी भारत-इराण-उझबेकिस्तान त्रिपक्षीय बैठक गेल्या महिन्यात प्रथमच आयोजित करण्यात आली होती.

शिपिंग लाइन 2017 मध्ये सुरू झाली

भारताने यापूर्वी 2017 मध्ये चाबहार-मुंबई आणि मुंद्रा बंदरा दरम्यान शिपिंग लाइन सुरू केली होती. जानेवारी 2019 मध्ये, दुसरा थेट शिपिंग मार्ग सुरू करण्यात आला. जो मुंबई, मुंद्रा, कांडला, चाबहार आणि शेवटी दक्षिण इराणमधील बंदर अब्बासमधून जातो. (Chabahar Port See Rout From India)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी बिभव कुमारला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

Online Vegetable Shopping : Blinkit भाजी खरेदीवर फ्री कोथिंबीर घेण्यास नकार! नेटकऱ्यांनी केली 'ही' मागणी

शरद पवारांना धक्का! 'या' नेत्याची 'राष्ट्रवादी'ला सोडचिठ्ठी; शिंदे म्हणाले, हातातोंडाशी आलेल्या मुलानं कायमस्वरूपी..

SCROLL FOR NEXT