Justin trudeau statement on hardeep singh nijjar  
ग्लोबल

Justin Trudeau : कॅनेडाचे पंतप्रधान ट्रूडोंच्या वक्तव्यानंतर काही तासांतच खलिस्तानी सक्रिय! भारताविरुद्ध रचला मोठा कट

रोहित कणसे

कॅनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर बिनबुडाचे आरोप केल्यानंतर कॅनडातील खलिस्तान समर्थकांना चांगलंच बळ मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. ट्रूडो यांनी केलेल्या आरोपांनंतर कॅनडाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये खलिस्तान समर्थकांनी कट रचण्यास सुरूवात केली असून यामुळे तेथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांसोबतच डिप्लोमॅट्स आणि भारतीय दूतावासाला देखील मोठा धोका निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खलिस्तानी समर्थकांनी 25 सप्टेंबर रोजी कॅनडाचे हायकमिशन आणि सर्व वाणिज्य दूतावासाबाहेर मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्याची तयारी केली आहे. इंटेलिजन्स एजन्सीला मिळालेल्या इनपुटच्या आधारे, ब्रिटिश कोलंबियाच्या सरे येथील गुरुद्वारात कांऊसिलच्या काही सदस्यांनी याबाबत कट रचल्याचे समोर आले आहे.

खलिस्तान समर्थक सक्रिय

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी त्यांच्या संसदेत नुकत्याच दिलेल्या निवेदनात भारतावर आरोप करत कॅनडाचे नागरिक हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमागे भारत सरकारचा हात असू शकतो, असे म्हटले आहे. तेव्हापासून कॅनडात बसलेले खलिस्तान समर्थक सक्रिय झाले आहेत. गुप्तचर संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान ट्रूडो यांच्या वक्तव्यानंतर खलिस्तानी समर्थकांनी सोमवारी ब्रिटिश कोलंबियातील एका गुरुद्वारामध्ये बैठक घेतली आणि भारताविरोधात मोठा कट रचण्याची तयारी सुरू केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरू नानक शीख गुरुद्वारा कौन्सिल ऑफ सरे, ब्रिटिश कोलंबियाचे प्रवक्ते सरदार मोनिंदर सिंग यांनी या बैठकीचे नेतृत्व केले. यावेळी, मोनिंदर सिंग आणि इतर काही खलिस्तानी आणि अतिरेक्यांनी एकत्रितपणे 25 सप्टेंबर रोजी कॅनडातील भारतीय समर्थक, येथील डिप्लोमॅट्स आणि त्यांच्या कुटुंबियांसह सर्व कॅनडाचे हायकमिशन आणि वाणिज्य दूतावासांसमोर मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्याची तयारी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशीही माहिती आहे की या संपूर्ण निदर्शनांना कॅनडाचे अनेक माजी खासदार,नेते तसेच काही अतिरेकी आणि खलिस्तान समर्थक पुढे घेऊन जात आहेत.

संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनडाच्या जमिनीवर यापूर्वीपासून खलिस्तान समर्थकांना कॅनडा सरकार आश्रय देत आलं आहे. त्यामुळे कॅनडा सरकारच्या समर्थनानेच भारत विरोधी कारवाया देशातील वेगवेगळ्या भागात सुरूच आहेत. मागील काही दिवसात खलिस्तान सर्वमताच्या नावाखाली कॅनडा सरकार भारत विरोधी खलिस्तान्यांना सुरक्षेसोबतच कार्यक्रम स्थळे देखील पुरवते.

महत्वाचे म्हणजे ट्रू़डो म्हणाले होते की कॅडाच्या सुरक्षा यत्रंणांकडे भारत सरकारच्या एजेंट्सनी निज्जरची हत्या केली असे मानण्याची कारणे आहेत.तसेच कॅनडाच्या यंत्रणा भारताचा या हत्तेतील सहभागाचा तपास करत आहेत. ट्रूडो यांनी कॅनडाच्या जमिनीवर कॅनेडियन नागरिकांच्या हत्तेमध्ये सहभाग अस्विकार्ह असल्याचे म्हटले आहे. यादरम्यान कॅनडाच्या सरकारने एका वरिष्ठ भारतीय राजनैतिकाची हकालपट्टी देखील केली आहे.

दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. ट्रूडो यांनी खलिस्तानी नेता हरदीप सिंग निज्जरची हत्येला भारताशी जोडल होते. तसेच परराष्ट्र मंत्री मेलानी जॉली यांच्या विधानावर देखील टीक करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने भारत एक मजबूत लोकशाही माणणारा देश आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत हा एक मजबूत लोकशाही देश आहे, जिथे कायद्याशी बांधिलकी बाळगली जाते. त्यात पुढे म्हटले आहे की, खलिस्तानी दहशतवादी आणि कट्टरतावाद्यांच्या कारवायांशी संबंधित प्रकरणांमध्ये कॅनडाचे सरकार काहीही करण्यास असमर्थता ही आमच्यासाठी दीर्घ काळापासून चिंतेचा विषय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission News : केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! DA अन् DR मध्ये लवकरच वाढीचे संकेत

Hindu Youth Killed in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू तरूणाला मारलं! २० दिवसांत कट्टरपंथीयांकडून सातवी हत्या

Pune Election: पुण्यात भाजपने नाराजांची काढली 'अशी' समजूत; तिकीट न मिळालेल्या इच्छूकांवर नवी जबाबदारी

MPSC Success : येरमाळ्याच्या वैभवची यशाची 'हॅट्ट्रिक'! तलाठी, एसटीआयनंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून 'पुरवठा अधिकारी' पदी झेप!

Caste Certificate Protest : मुलाला जातीचा दाखला नाकारला; अन् आईने टॉवरवर चढून १४ तास केले आंदोलन; पोलिसांच्या शिष्टाईने सुखरूप सुटका!

SCROLL FOR NEXT