75th independence day 
ग्लोबल

अभिमानास्पद!  कॅनडामध्ये उभारला महात्मा गांधींचा बर्फाचा पुतळा

सकाळवृत्तसेवा

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे दोनही दिवस प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी खास आहे. या दिवसांपासून खऱ्या अर्थाने लोकशाहीचे एक नवे पर्व सुरु झाले. म्हणूनच हे दिवस देशात मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि खऱ्या अर्थाने भारतीयांना स्वातंत्र्य मिळाले. देशात लवकरच  ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्य दिनासाठी काही महिने शिल्लक असतानाच कॅनडामध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महात्मा गांधी यांचा बर्फाचा पुतळा तयार करण्यात आला आहे.

कॅनडामधील डी ग्लेस या हॉटेलमध्ये महात्मा गांधी यांचा ७ फूट उंच बर्फाचा पुतळा तयार करण्यात आला आहे. हा पुतळा कॅनडामधील आइस आर्टिस मार्क लेपायर यांनी तयार केला आहे. टोरंटोमधील भारतीय दुतावासाने शनिवारी ट्विट करुन याविषयी माहिती दिली आहे.

"देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने #AzadiKaAmritMahotsav चा शुभारंभ, आयकॉनिक आइस हॉटेलमध्ये महात्मा गांधींचा बर्फाचा पुतळा उभारण्यात आला आहे", असं कॅप्शन देत भारतीय दुतावासाने हा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, क्यूबेक सिटीपाशी असलेले हे हॉटेल कॅनडाचं एक लँडमार्क असल्याचं म्हटलं जातं. २०२१ मध्ये हे हॉटेल खुलं झालं असून ते लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT