ग्लोबल

कॅनडाच्या पंतप्रधानांवर लपून बसण्याची वेळ; निवासस्थानाला आंदोलकांचा घेराव

सकाळ डिजिटल टीम

ट्रक चालकांकडून कॅनडाचे झेंडे फडकावले जात असून स्वातंत्र्याची मागणी केली जात आहे. तसंच जस्टिन ट्रुडो यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली जात आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना त्यांचे निवासस्थान सोडून पळून जाण्याची वेळ आली आहे. कॅनडाची राजधानी ओटावातीला पंतप्रधानांच्या निवासस्थानाला ५० हजार ट्रक चालकांनी २० हजार ट्रकच्या सहाय्याने घेरलं आहे. त्यामुळे पंतप्रधानांचे कुटुंबिय गुप्त ठिकाणी लपण्यासाठी गेलं आहे. देशात कोरोना लस बंधनकारक केल्यानं आणि कोरोना लॉकडाऊनच्या निषेधार्थ ट्रक चालक आक्रमक झाले आहेत. ट्रक चालकांनी त्यांच्या ७० किमी लांब अशा ताफ्याला Freedom Convoy असं नाव दिलं आहे.

शनिवारी हजारोंच्या संख्येनं ओटावामध्ये एकत्र आलेल्या ट्रकचालकांनी अमेरिकेची सीमा ओलांडण्यासाठी लसीकरण बंधनकारक करण्याच्या निर्णयाचा विरोध केला. याआधी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी ट्रक चालकांना महत्त्वाचे नसलेले अल्पसंख्यांक असं म्हटलं होतं. यामुळे संतापलेल्या ट्रक चालकांनी राजधानीकडे आपला मोर्चा वळवला आहे.

दरम्यान, ट्रक चालकांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांचाही पाठिंबा मिळाला आहे. ट्रक चालकांकडून कॅनडाचे झेंडे फडकावले जात असून स्वातंत्र्याची मागणी केली जात आहे. तसंच जस्टिन ट्रुडो यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली जात आहे. ट्रक चालकांना इतरांचाही पाठिंबा असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांविरोधात आवाज उठवला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT