BAPS Mandir Open For All Esakal
ग्लोबल

BAPS Mandir Open For All: अबुधाबीमधील हिंदू मंदिर भाविकांसाठी खुलं; टाईट ड्रेस, टी-शर्ट घालून जाण्यावर बंदी.. काय आहेत नियम?

BAPS Mandir Open For All: अबुधाबीमधील हिंदू मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भाविकांना मान, कोपर आणि घोट्यांवरील शरीराचा भाग झाकून ठेवावा लागेल, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर टोपी, टी-शर्ट, जीन्सला परवानगी नाकारण्यात आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

BAPS Mandir Open For All: संयुक्त अरब अमिराती (UAE) अबुधाबी, येथील पहिले हिंदू मंदिर काल (शुक्रवारी) सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 फेब्रुवारी रोजी अबू धाबीच्या या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले होते. मंदिर व्यवस्थापनाने आपल्या वेबसाइटवर भाविक आणि मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये ड्रेस कोडपासून फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीपर्यंतचे नियम समजावून सांगितले आहेत.

मंदिराच्या वेबसाइटवर नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, टी-शर्ट, कॅप आणि घट्ट कपडे घालून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भाविकांना मान, कोपर आणि घोट्यांमधील शरीराचा भाग झाकून ठेवावा लागेल, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर आक्षेपार्ह डिझाइन असलेल्या टोपी, टी-शर्ट आणि इतर कपड्यांना परवानगी नाही. जाळी किंवा सी-थ्रू आणि फिटिंग कपडे घालू नका असेही नमूद करण्यात आले आहे.

पाळीव प्राण्यांनाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. याशिवाय मंदिर परिसरात बाहेरील खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थांना परवानगी दिली जाणार नाही. तसेच, मंदिर परिसरात ड्रोन कॅमेरे किंवा ड्रोनला सक्त मनाई आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार मंगळवार ते रविवार सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत मंदिरे उघडी राहतील. दर सोमवारी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे.

दुबई-अबू धाबी शेख झायेद महामार्गावरील अल रहबाजवळ २७ एकर परिसरात सुमारे ७०० कोटी रुपये खर्चून हे मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिरासाठी जमीन यूएई सरकारने दान केली आहे. हे मंदिर नगर शैलीत बांधण्यात आले आहे. तसेच अयोध्येत राम मंदिर बांधले आहे. मंदिरातील स्वयंसेवक उमेश राजा यांच्या म्हणण्यानुसार, 20 हजार टनांहून अधिक चुनखडीचे तुकडे राजस्थानमध्ये कोरले गेले आणि 700 कंटेनरमध्ये अबुधाबीला आणले गेले.

बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था यांनी सोशल मिडीया (BAPS) 'X' पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे, या पोस्टमध्ये लिहलं आहे की, "प्रतीक्षा संपली! अबुधाबीचे मंदिर आता सर्व भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे." हे मंदिर सोमवार वगळता सर्व दिवस सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत खुले राहणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: मोठी बातमी! अशोक खरातचं बिंग फोडणारा निरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; खरातच्या संपत्तीची माहिती आली समोर

Dhule Election : धुळे जिल्ह्यात निवडणुकीचा धुरळा! ४७ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक जाहीर; २८ एप्रिलला मतदान

Thane News: ठाणे एसटी आगारात मोठा बदल होणार, प्रवाशांना दिलासा मिळणार, प्रशासनाने उचलले महत्तवाचे पाऊल

LPG सिलिंडरच्या मुद्यावर सरकारने केले हात वर? नागरिकांना विकल्प शोधण्याचे आवाहन, नेमकं काय सांगितलं?

Iran War : अमेरिका-इराण युद्धामुळे इंग्लंडचे क्रिकेट खेळायचे झालेत वांदे! Dukes Ball चा तुटवडा अन् गगनाला भिडल्या किमती...

SCROLL FOR NEXT