tom moore 
ग्लोबल

ब्रिटनचे 'कोरोना फंडरेजर हिरो' कॅप्टन टॉम यांचं 100 व्या वर्षी निधन; 4 कोटी डॉलरची केलेली मदत

सकाळवृत्तसेवा

लंडन : कर्नल टॉम मूर यांनी ब्रिटीश हॉस्पिटल्सच्या मदतीसाठी 4 कोटी डॉलर जमवले होते. त्यांच्या या अभूतपूर्व कार्याबद्दल त्यांना 'कॅप्टन हिरो' म्हटलं गेलं होतं. तसेच देशातील सर्वांत मोठा सन्मान 'नाइटहूड' देखील त्यांना दिला गेला होता. मात्र, कोरोना व्हायरस विरोधातील लढाईत उतरलेल्या या 100 वर्षाच्या योद्ध्याला गेल्या महिन्यात कोरोना व्हायरसची लागण झाली होती. काल मंगळवारी त्यांचं निधन झालं. 

कर्नल मूर यांच्यावर निमोनियासाठी उपचार सुरु होते. तसेच गेल्या महिन्यात ते कोरोना व्हायरसने संक्रमित आढळले होते. त्यांना श्वासोच्छवासात त्रास झाल्याने त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं गेलं होतं. मात्र त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिघडतच होती. सरतेशेवटी काल मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कर्नल मूर यांनी आपल्या बागेमध्ये चकरा मारून चॅरिटीद्वारे नॅशनल हेल्थ सर्व्हीससाठी पैसे जमा केले होते. 

त्यांच्या या अभूतपूर्व योगदानाबद्दल त्यांना प्रिंस विल्यम यांनी देखील डोनेशन दिलं होतं. त्यामुळे मीडिया आणि सोशल मीडियात त्यांची चर्चा होती. त्यांच्या या संवेदनशीलतेबाबत आणि जिद्दीबद्दल लोकांनी त्यांचं अमाप कौतुक केलं होतं. ब्रिटनच्या क्वीन एलिझाबेथ यांनी देखील आयसोलेशनमधून बाहेर येऊन त्यांना नाइटहूड हा सन्मान दिला होता. टॉम हे सैन्यातून कॅप्टन पदावरुन रिटायर झाले होते तसेच त्यांना कर्नल पदवीने गौरवण्यात आले होते. 

कर्नल मूर यांनी आपल्या वयाची जराही तमा न बाळगता आपल्या बागेच्या अनेक चकरा मारल्या होत्या. ही एक देणगी गोळा करण्यासाठीची मोहिम होती. याद्वारे त्यांनी चक्क 33 मिलीयन पाऊंड ($40 million) पैसे जमा केले होते. या मोहिमेमुळे ते एक नॅशनल हिरो बनले तसेच क्वीनकडून त्यांना सन्मानित देखील करण्यात आलं. दुसऱ्या महायुद्धात ते सैन्यात भरती झाले. सैन्यात त्यांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या. रिटायर झाल्यावर त्यांनी सेल्समन म्हणून काम केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

Blinkit-Zeptoवरून ५ किलोपेक्षा जास्त साखर मिळणार नाही! सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना झटका; Online खरेदीवर मर्यादा...

Marathi News Live Updates : 'लाडक्या बहिणींना' नागपूर महानगर पालिकेतर्फे रक्षाबंधनाची भेट

Mumbai Local: पार्किंगची फेररचना, नायगाव-भाईंदरमध्ये ३१ नव्या मार्गिका; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT