Caterpillar Fungus esakal
ग्लोबल

हिमालयात आढळणारा 'हा' कीडा बाजारात तब्बल 9 लाखांना विकला जातो!

बाळकृष्ण मधाळे

जगभरात किटकांच्या अनेक प्रजाती आपल्याला पहायला मिळतील आणि अशा काही प्रजाती आहेत, त्यांना लोक मोठ्या उत्साहानं खातात. मात्र, आपण आज ज्या किड्याबद्दल सांगणार आहोत, तो इतर किटकांपेक्षा खूपच वेगळा आहे. कारण, याचा औषधी वनस्पती म्हणून देखील सर्रास वापर करतात. हा कीडा तपकिरी रंगाचा असून दोन इंच लांब आहे. या किड्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, त्याची चव गोड आहे. हा कीडा हिमालयीन प्रदेशात तीन ते पाच हजार मीटर उंचीवर आढळतो. (Caterpillar Fungus Most Expensive Worm In The World Also Known As Yarshagumba)

जगभरात किटकांच्या अनेक प्रजाती आपल्याला पहायला मिळतील आणि अशा काही प्रजाती आहेत, त्यांना लोक मोठ्या उत्साहानं खातात.

हिमालयाच्या सुंदर खोऱ्यात सापडलेल्या या किड्याला बरीच नावं आहेत. भारतात याला 'कीडा जडी' म्हणून देखील ओळखलं जातं, तर नेपाळ आणि चीनमध्ये याला 'यार्सागुंबा' असे म्हणतात. तिबेटमध्ये याचं नाव 'यार्सागुम्बा' असं आहे. या व्यतिरिक्त, या किडीचं वैज्ञानिक नाव 'ओफियोकोर्डिसेप्स साइनेसिस' (Ophiocordyceps Sinensis) असं आहे, तर इंग्रजीमध्ये याला 'कॅटरपिलर फंगस' (Caterpillar Fungus) असं म्हणतात. कारण, ते बुरशीच्या प्रजातीत मोडतं. तसेच या किड्याला 'हिमालयीन वियाग्रा' म्हणून देखील ओळखलं जातं. या किड्याचा औषधांसह बर्‍याच गोष्टींमध्ये वापर केला जातो. हा कीडा आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो, शिवाय फुफ्फुसांच्या उपचारांमध्ये देखील याचा प्रभाव चांगला पहायला मिळतो. मात्र, हा कीडा अत्यंत दुर्मिळ असून तितकाच तो महाग देखील आहे.

Ophiocordyceps Sinensis

बाजारपेठेत या अळीची किंमत साधारण एक अळी सुमारे 1000 रुपयात उपलब्ध आहे. तर दुसरीकडे आपण किलोनुसार पाहिलं तर आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) हा कीडा प्रतिकिलो 8 ते 9 लाख रुपयांना विकला जातो. म्हणूनच, याला जगातील सर्वात महागडा कीडा म्हणतात. आंतरराष्ट्रीय बाजारात किड्यांच्या किंमती मोठ्या प्रमाणात खाली आल्या असल्या तरी, गेल्या काही वर्षांपासून प्रतिकिलो 19 ते 20 लाख रुपये दराने विकल्या जाणाऱ्या या किडीची किंमत आता आठ ते नऊ लाख रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली आहे.

International Market

भारतातील बर्‍याच भागांत कॅटरपिलरचा संग्रह करणं हा कायद्यानं गुन्हा मानला. मात्र, व्यापारात याचा सर्रास बेकायदेशीर वापर केला जात आहे. यापूर्वी नेपाळमध्ये या अळीवर बंदी होती. पण, नंतर ही बंदी उठवण्यात आली. असं म्हटलं जातं, की हजारो वर्षांपासून या किड्याचा औषधी वनस्पती म्हणून वापर केला जात आहे. हे किडे गोळा करण्यासाठी लोक डोंगरावर तंबू लावतात आणि बरेच दिवस तिथेच राहतात.

Nepal

या यार्सागुम्बाच्या जन्माची कहाणीही खूपच विचित्र आहे. हिमालयीन प्रदेशात वाढणार्‍या ठराविक वनस्पतींमधून बाहेर पडलेल्या रसातून याचा जन्म झाल्याचे बोलले जाते. या किड्यांचं कमाल वय फक्त सहा महिने असतं, तर बहुतेकदा ते हिवाळ्याच्या हंगामात जन्माला येतात आणि मे-जून पर्यंत त्यांचा मृत्यू होतो. त्यानंतर लोक या किड्यांना गोळा करतात आणि बाजारात विक्रीसाठी घेऊन जातात.

Caterpillar Fungus Most Expensive Worm In The World Also Known As Yarshagumba

Caterpillar Fungus

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : अयोध्येत भाविकांनी गणेश मूर्तीचे विसर्जन केले

IndiGo flight technical glitch: कोचीहून अबुधाबीला १८० प्रवाशांसह निघालेल्या इंडिगो विमानात उद्भवला तांत्रिक बिघाड अन् मग...

"नागरिकांच्या जीवाची किंमत आहे का ?" टेस्ला कार घेतल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईकांना अभिनेत्याचा सवाल, "एवढा पैसा कुठून आला ?"

Shocking! माथेफिरू तरुणाने चाव्या हिसकावल्या, प्रवाशांनी भरलेली बस सुरू केली अन्...; अनेकांना चिरडले

Latest Maharashtra News Updates : गणेश विसर्जनामुळे वाहतूक कोंडी, मनमाडच्या वाहतूक मार्गात बदल

SCROLL FOR NEXT