Charlie Chaplin esakal
ग्लोबल

Charlie Chaplin : स्वतःचे दुःख लपवून जगाला हसवणाऱ्या चार्ली चॅपलीनचा मृतदेहही गेला होता चोरीला

मृत्यूनंतरही अनेक वर्ष होऊनही चार्ली चॅपलीन यांचे चाहते आजही बघायला मिळतात.

धनश्री भावसार-बगाडे

Charlie Chaplin's Birthday : जगभरात सर्वात मोठा कॉमेडियन म्हणून आजही चार्ली चॅपलीन ओळखला जातो. स्वतःच्या आयुष्यात अनेक दुःख, कष्ट भोगलेला चार्ली चॅपलीन मात्र कायम इतरांना हसवतच राहीला. स्वतःचे दुःख लपवून इतरांना त्यांचे दुःख विसरायला लावणारा हा किमयागार होता.

१६ मार्च १८८९ मध्ये जन्म तर २५ डिसेंबर १९७७ मध्ये त्याचा मृत्यू झाला होता. ८८ वर्ष तो जगला पण त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवाचीही चोरी झाली होती. काय आहे किस्सा जाणून घेऊया.

मृतदेहाची चोरी

चार्लीला स्वीत्झर्लंडच्या कोर्सियर सर वेवे मध्ये दफन करण्यात आलं होतं. पुरल्या नंतर तीन महिन्यांनी त्याचा मृतदेह चोरीला गेला. मृतदेह चोरल्यानंतर चोरांनी चार्लीच्या पत्नी उना चॅपलीन यांना खंडणीची मागणी केली. या गोष्टीची माहिती कळताच पोलिसांनी ताबडतोब कृती केली आणि चोरही पकडले गेले. दोन जणांनी त्याचा मृतदेह चोरला होती. त्यांच नाव रोमना वारदा, आणि गेंचो गानेव असं होतं.

नव्या व्यवसायासाठी चोरी

चौकशीच्या दरम्यान या चोरांनी सांगितलं की, आर्थिक ताणातून जात होते. त्यामुळे चार्लीच्या मृतदेहाच्या खंडणीतून मिळणाऱ्या पैशांनी त्यांना नवा व्यवसाय सुरू करायचा होता. यानंतर चार्लीचा मृतदेहाला स्वित्झर्लंडच्या जवळ असलेल्या विलेज ऑ नोविले इथे पुरण्यात आलं. यानंतर चार्लीची कब्र काँक्रिटने बनवण्यात आली, जेणे करून परत चोरी होऊ नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ना भूकंप, ना पाऊस... तरी खचला राष्ट्रीय महामार्ग, स्कूलबससह अनेक गाड्या अडकल्या

ज्वालामुखी, नैसर्गिक आपत्ती अन् ... 2026 बाबत पुराणात नेमकं काय लिहिलंय, भविष्यवाणी कलियुगासाठी ठरत आहेत खरी? वाचा धक्कादायक सत्य!

Mahaparinirvan : कशी होती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची अंत्ययात्रा? लाखोंची गर्दी अन् अश्रुधारा, महापरिनिर्वाण दिनाचा हृदयस्पर्शी व्हिडिओ

ही होती रोल्स रॉयसमधून फिरणारी पहिली भारतीय अभिनेत्री, स्टाईलने प्रेक्षकांना केलं मंत्रमुग्ध पण शेवट झाला दुर्दैवी

Grok AI : एआयने जग जाहीर केला तुमच्या घराचा पत्ता अन् फोन नंबर; इलॉन मस्कच्या ग्रोकने ओलांडल्या सर्व सीमा, पाहा आता काय करायचं?

SCROLL FOR NEXT