Donal Trump 
ग्लोबल

Shootout Donald Trump Rally: 'त्या' चार्टमुळं वाचले डोनाल्ड ट्रम्प यांचे प्राण! शेवटचा मिलिसेकंद...; ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलंय?

Gunfire on Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक प्रचार रॅलीदरम्यान गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Shooting at Donald Trump Rally: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक प्रचार रॅलीदरम्यान गोळीबार झाल्याची घटना रविवारी घडली. यामुळं अवघ्या जगभरात खळबळ उडाली होती. बंदुकीची गोळी केवळ कानाला चाटून गेल्यानं ट्रम्प बचावले. पण ट्रम्प या हल्ल्यातून आश्चर्यकारकरित्या कसे बचावले? याची चर्चा सुरु असताना एका चार्टमुळं आपला जीव वाचल्याचं खुद्द ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

विविध माध्यमांतील वृत्तांनुसार, हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं, "शेवटच्या मिलीसेकंदात मी माझं डोकं किंचितसं फिरवलं त्यामुळं बंदुकीतून सुटलेली गोळी माझ्या कानाला चाटून गेली अन्यथा ती डोक्यातून आरपार गेली असती आणि माझा मृत्यू झाला असता" ट्रम्प यांच्या भाषणादरम्यानचा व्हिडिओ देखील समोर आला आहे त्यातून हे स्पष्ट होतं आहे.

पण ट्रम्प यांनी डोकं का फिरवलं हे सांगताना ट्रम्प म्हणतात की, "रॅलीच्या ठिकाणी एक मोठी स्क्रीन लावण्यात आली होती. त्यावर अमेरिकेत बेकायदा स्थलांतर केलेल्यांची आकडेवारी फ्लॅश होत होती. या आकडेवारीकडं पाहण्यासाठी त्यांनी आपलं डोकं त्या दिशेनं वळवलं.

आकडेवारीच्या या चार्टनंच खरंतर माझा जीव वाचवला, जर मी हा चार्ट पाहण्यासाठी डोकं फिरवलं नसतं तर माझा मृत्यू अटळ होता, असं ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसचे माजी डॉक्टर रॉनी जॅक्सन यांच्याशी बोलताना सांगितलं. तसंच इथं सीमेवर गस्तीवर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी माझे प्राण वाचवले, असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

Record Broken! पंजाब किंग्सने नोंदवली IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्या; प्रियांश आर्य, कूपर कॉनलीसह सारेच लखनौच्या गोलंदाजांवर तुटून पडले...

Crime: लॅबमध्ये बोलवलं; संधी मिळताच जवळ ओढून चुंबन घेतलं, नंतर...; शाळेतच महिला शिक्षिकेसोबत दुसऱ्या शिक्षकाचं विकृत कृत्य

DGCA उपसंचालकांना लाच प्रकरणात अटक, ड्रोन आयातीसाठी मागितले होते २.५ लाख

Latur Missing Kids Case: लातूर हादरलं! दोन चुलत भावंडं बेपत्ता; सहा वर्षीय देवांशचा मृतदेह सापडला, साईचरणचा अद्याप शोध सुरू

SCROLL FOR NEXT