Career guidance on AI ChatGPT  sakal
ग्लोबल

ChatGPT बनवणाऱ्या कंपनीमध्ये नोकरीची संधी; साडेतीन कोटी रुपयांपर्यंत मिळेल पॅकेज

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः ओपन एआयने मागच्या वर्षी आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स (AI) बेस चॅटबॉट चॅटजीपीटी लाँच केलं होतं. तेव्हापासून ChatGPT AI चर्चेत आहे. एआय माणसांवर अतिक्रमण करेल, नोकऱ्या जातील, असं सांगितलं जात होतं. परंतु ही बातमी बरोबर उलटी आहे.

चॅट जीपीटी बनवणाऱ्या कंपनीमध्ये पदभरती निघाली आहे. शिवाय पॅकेजही साडेतीन कोटींच्या घरात. ओपन एआय या कंपनीने रिक्त जागांसाठी भरती काढली आहे. रिक्त असलेली पदंदेखील महत्वाची आहेत.

महत्त्वाचं म्हणजे ओपन एआय ही कंपनी फ्रेश टॅलेंटच्या शोधात आहे. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी जान लेईक यांनी रिक्त जागा आणि आवश्यक स्किलसंदर्भातील माहिती दिली आहे. ज्यांच्याकडे कोडिंग, मशिन लर्निंग आणि इतर गोष्टींचं चांगलं ज्ञान आहे, त्यांना संधी मिळणार आहे.

कंपनीने निवडलेल्या उमेदवारांना ३.७ कोटी रुपयांपर्यंत वार्षिक पॅकेज मिळू शकणार आहे. OpenAI च्या SuperAlignment टीममध्ये रिसर्च इंजिनिअर्सची गरज आहे. संशोधक अभियंता हे सुरक्षेच्या संबंधाने काम बघतील. या नोकरीतील वार्षिक पगार US $ 2,45,000 (सुमारे 2 कोटी) ते US $ 4,50,000 (सुमारे 3.7 कोटी) पर्यंत असेल. याशिवाय अतिरिक्त भत्तेदेखील मिळणार आहेत.

ChatGPT हे एक कृत्रिम बुद्धिमत्ता टूल आहे. ChatGPT हा एक प्रकारचा चॅटबॉट असून ज्याच्या मदतीने तुम्ही चॅट करू शकता. तुम्ही ChatGPT ला कोणताही प्रश्न विचारू शकता. जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा ते तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देते. भविष्यात एआय माणसांवर राज्य करेल, अशी भीतीदेखील व्यक्त केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT