Taipei 
ग्लोबल

जम्बो चेक शिष्टमंडळ तैवानमध्ये; चीनच्या कडव्या विरोधानंतरही दौरा आयोजीत

वृत्तसंस्था

तैपेई - चीनच्या कडव्या विरोधानंतरही चेक प्रजासत्ताकाचे 80 सदस्यांचे जम्बो शिष्टमंडळ तैवान दौऱ्यावर रविवारी दाखल झाले. चीनने याबद्दल तीव्र टीका केली आहे.

संसदेचे अध्यक्ष मिलॉस विस्त्रचील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात प्रागचे महापौर झेडनेक ह्रीब यांचा समावेश आहे. सरकारी तसेच उद्योग, शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांचाही यात समावेश आहेत. राजनैतिकदृष्ट्या तैवान एकाकी पडावा यासाठी चीनचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यास शह देण्याच्या उद्देशाने चेकने हे दौरा आखला आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैवानचे परराष्ट्र मंत्री जोसेफ वू यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. चायना एअरलाईन्स या तैवानच्या कंपनीच्या विशेष विमानाने या प्रतिनिधींनी प्रवास केला.

गेल्याच आठवड्यात चीनचे परराष्ट्र प्रवक्ते झाओ लिजीयन यांनी या दौऱ्याचा निषेध केला होता. चेकने एकसंध चीन या तत्त्वाचे पालन करावे आणि तैवानबाबतचे विषय विवेकी आणि योग्य पद्धतीने हाताळावेत असे त्यांनी बजावले होते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इशाऱ्यानंतरही दौरा
विस्त्रचील यांच्याआधी यारोस्लाव कुबेरा संसदेचे अध्यक्ष होते. त्यांनी हा दौरा आखला होता, त्यावेळी चीनचे समर्थक असलेले चेक प्रजासत्ताकाचे अध्यक्ष मिलॉस झीमान संतापले होते. कुबेरा यांचे जानेवारी निधन झाले. तैवानच्या अध्यक्ष त्साई इंग-वेन यांचे अभिनंदन करू नये असा इशारा चेक प्रजासत्ताकातील चिनी वकिलातीने दिला होता. चीनने अशा प्रकारे दबाव टाकल्यामुळेच हा दौरा आखण्यात आल्याचे विस्त्रचील यांनी ठामपणे सांगितले.

चीनचे डाव

  • तैवान हा आपला प्रांत असल्याचा दावा
  • चीनच्या वाढत्या राजनैतिक दबावामुळे स्वयंशासित देशाचे औपचारिक संबंध असलेले देश केवळ 15
  • यात बहुतांश देश पॅसिफिक, मध्य अमेरिका आणि कॅरेबियन समूहातील छोटे देश
  • प्राग-बीजिंग करार संपुष्टात
  • तैवान हा चीनचा भाग असल्याचा करारातील उल्लेख काढण्यास प्रागचा नकार

...म्हणून चीनचा संताप

  • चेकमध्ये तैवानमधील तंत्रज्ञान कंपन्यांची मोठी गुंतवणूक 
  • आर्थिकदृष्ट्या हा देश चीनवर कमी प्रमाणात अवलंबून आहे. हे चीनच्या संतापाचे एक मुख्य कारण आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT