Mexico Truck Accident esakal
ग्लोबल

मेक्सिकोत ट्रकचा भीषण अपघात; 49 जणांचा मृत्यू, 58 जण जखमी

सकाळ डिजिटल टीम

मेक्सिकोमध्ये रात्री उशिरा दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे.

मेक्सिकोमध्ये (Mexico) गुरुवारी रात्री उशिरा दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. चियापासमधील (Chiapas) दक्षिण-पूर्व मेक्सिकन शहर तुक्स्टला गुटिरेझजवळ दोन ट्रकची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 49 जण ठार, तर 58 जण जखमी झाले आहेत. बचाव पथकानं (Mexico Rescue squad) ही माहिती दिलीय.

या भीषण अपघातातील एका ट्रकमध्ये मध्य अमेरिकेतील 100 हून अधिक प्रवासी होते. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात 58 जण जखमी झाले असून, त्यापैकी तीन जण गंभीर जखमी आहेत. त्यांना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात 49 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती बचाव पथकानं गुरुवारी रात्री उशिरा फेसबुकवर दिलीय.

चियापासचे गव्हर्नर रटिलियो एस्कंडन (Governor Ratilio Eskandon) यांनी पीडितांच्या कुटुंबीयांप्रति दु:ख व्यक्त केलंय. या अपघातासाठी जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय. अद्याप या मृतांची कोणतीही ओळख पटलेली नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचं समजतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT