pp India Action esakal
ग्लोबल

Chile Forest Fire : हजारो घरं जळून खाक, 46 जणांचा मृत्यू; चिलीच्या जंगलात भीषण आग

मध्य आणि दक्षिण चिलीच्या जंगलामध्ये आगीमुळे आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. चिलीच्या राष्ट्रपतींनी याची पुष्टी केलीय. आगीमुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रेस्क्यू टीमच्या वतीने आगीमुळे भस्मसात झालेल्या घरांचा तपास सुरु झाला आहे.

संतोष कानडे

नवी दिल्लीः मध्य आणि दक्षिण चिलीच्या जंगलामध्ये आगीमुळे आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. चिलीच्या राष्ट्रपतींनी याची पुष्टी केलीय. आगीमुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रेस्क्यू टीमच्या वतीने आगीमुळे भस्मसात झालेल्या घरांचा तपास सुरु झाला आहे. आग वरचेवढ वाढत असून त्यामुळे धोका वाढत चालला आहे. चिली सरकारने आणीबाणीची घोषणा केली आहे.

चिलीच्या जंगलांमध्ये आग लागणं नवीन बाब नाही. येथील तापमान ४० अंशांवर पोहोचलं आहे. त्यामुळेच संकट आणखीनच वाढलं आहे. ही आग मुख्यत्वे करुन वालपरिसो पर्यटन क्षेत्राच्या आसपास लागली आहे. येथील हजारो हेक्टरवरील जंगल नष्ट झालेलं आहे. किनाऱ्यालगतच्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर धूर वाढला असून लोकांनी घरं सोडून जाण्यास सुरुवात केलीय.

आपत्कालनी कार्यवाहीचा भाग म्हणून सरकारने शनिवारपासूनच संचारबंदी लागू केलीय. गृहमंत्री कॅरोलिना तोहा यांनी शनिवारी १९ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. शिवाय १५८ ठिकाणी आग लागली असून त्यामुळे ४३ हजार क्षेत्र बाधित झालेलं आहे.

याशिवाय चिलीतील आगीमुळे राजधानीच्या नैऋत्येकडील एस्ट्रेला आणि नवीदाद या शहरातील एक हजार घरं जळून खाक झाली आहेत. पिचिलेमूच्या सर्फिंग रिसॉर्टजवळील लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं आहे. आणखीही अनेकांना घरं सोडून जावं लागणार असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT