Indian Student jailed in UK eSakal
ग्लोबल

UK : नशेत असलेल्या महिलेला घरी नेऊन केला अत्याचार, भारतीय विद्यार्थ्याचं ब्रिटनमध्ये दुष्कृत्य; CCTV फुटेज समोर

याप्रकरणी प्रीतला सहा वर्ष तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे.

Sudesh

ब्रिटनमधील कार्डिफ शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका भारतीय विद्यार्थ्याने नशेत असलेल्या महिलेला आपल्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. याप्रकरणी या विद्यार्थ्याला शिक्षा जाहीर झाली आहे. गेल्या वर्षी घडलेल्या या घटनेसंबंधी एका वर्षानंतर निकाल देण्यात आला आहे.

३ जून २०२२ रोजी ही घटना घडली होती. इंजिनिअरिंगला असणाऱ्या प्रीत विकाल या तरुणाने हे दुष्कृत्य केलं होतं. प्रीत हा ब्रिटनमध्ये शिष्यवृत्ती घेऊन शिकत होता. या घटनेच्या १३ दिवसांनंतर त्याला अटक करण्यात आली होती. ब्रिटनमधील कार्डिफ शहरात हा प्रकार घडला होता. याप्रकरणी प्रीतला सहा वर्ष तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पबच्या बाहेर विकाल या महिलेला भेटला होता. ही महिला यावेळी पूर्णपणे दारूच्या नशेत होती. यावेळी ही महिला आपल्या मैत्रिणींसोबत होती, मात्र प्रीतने तिला बोलण्यात गुंतवत बाजूला नेले. यानंतर ती नशेत असल्याचं पाहून प्रीतने तिला उचलून आपल्या फ्लॅटवर नेलं.

सीसीटीव्ही फुटेज समोर

प्रीत या महिलेला आपल्या घरी नेत असतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या व्हिडिओमध्ये तो एका पार्किंग लॉटमध्ये दिसतोय. त्याच्या हातात नशेत बेशुद्ध असलेली ही महिलाही दिसून येत आहे.

बलात्कार आणि कबूली

प्रीतने या महिलेला घरी नेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर बेडवर तसंच झोपलेल्या प्रीतचा फोटो काढून त्याने आपल्या मित्रासोबत शेअर देखील केला. दुसऱ्या दिवशी या महिलेला रात्रीची काहीही आठवत नव्हतं. त्यानंतर जेव्हा ती घरी गेली, तेव्हा प्रीतने इन्स्टाग्रामवर तिला मेसेज केला. यावेळी बोलताना त्याने आपल्या कृत्याची कबूली दिली, आणि यावेळी आपण काँडम वापरलं नव्हतं, असंही त्याने सांगितलं. यानंतर या महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.

वर्षानंतर मागितली माफी

कोर्टात खटला दाखल होताच प्रीतने सुरुवातीला आपण असं काही केलं नसल्याचा कांगावा केला. मात्र, नंतर त्याने आपल्या कृत्याची कबूली दिली. त्याने आपल्या वकिलातर्फे पत्र लिहून या तरुणीची माफी देखील मागितली.

"मी जे केलं ते चुकीचं होतं, आणि मला समजतंय की याचा तिच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये मी माझ्या कृत्याचा पश्चाताप करतो आहे. मी जे नुकसान केलं आहे, ते या शब्दांनी भरून निघणार नाही. मात्र मला आशा आहे की माझी ही माफी हीलिंग आणि क्षमा करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल ठरेल." असं या पत्रामध्ये लिहिलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT