Fire sakal
ग्लोबल

China Fire : आगीच्या दोन वेगवेगळ्या घटनेत २१ जणांचा मृत्यू; वसतिगृहातील आगीत १३ विद्यार्थी होरपळले

चीनमध्ये आगीच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह किमान २१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.

पीटीआय

बीजिंग - चीनमध्ये आगीच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह किमान २१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.

पहिल्या घटनेत चीनच्या मध्य हेनान प्रांतात प्राथमिक शाळेच्या वसतिगृहाला लागलेल्या आगीत १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. हे सर्व विद्यार्थी तिसरीत शिकत होते, अशी माहिती एका शिक्षकाने हेबेई प्रांतातील ‘झोंगलान न्यूज’ ला दिली. आगीतून बचावलेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे ‘सीसीटीव्ही’ या वृत्तसंस्थेने सांगितले. हेनानमधील यिंगझाय शाळेच्या वसतिगृहात काल रात्री आग ११ वाजता लागली.

या प्रकरणी शाळा मालकाला ताब्यात घेतले. शाळेच्या ‘वुई चॅट’ पेजवरील माहितीनुसार यिंगझाय शाळेचे वसतिगृह बालवाडीला संलग्न असले तरी तेथे प्राथमिक शाळेतील मुलांची राहण्याची सोय केली जाते. येथील बहुतेक विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत, असे ‘बीजिंग यूथ डेली’ने म्हटले आहे.

स्फोटात आठ जण दगावले

जिआंगसू प्रांतातील छांगचो शहरातील एका कारखान्यात आज पहाटे साडेतीनच्या सुमारास स्फोट झाला. त्यामुळे लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला. यात इतर आठ जणांना किरकोळ दुखापती झाल्याचे आपत्कालीन व्यवस्थापन अधिकाऱ्याने सांगितले. घटनास्थळी बचावकार्य पूर्ण झाले असून चौकशी सुरू असल्याची माहिती ‘शिन्हुआ’ या वृत्तसंस्थेने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Chahar Divorce: क्रिकेटर राहुल चहरचा घटस्फोट!, भाविनक पोस्टद्वारे सोशल मीडियावर झाला व्यक्त

Amravati Crime : भारवाडीनजीक युवकाची निर्घृण हत्या, हल्लेखोर पसार; मृत व्यक्ती गुजरातचा रहिवासी

Trump Tariff: डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ बेकायदेशीर; अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, सुनावणीत काय घडलं?

Amravati News : महापालिकेच्या स्थायी समितीत महायुतीचे वर्चस्व, आठ स्वीकृत सदस्यांची निवड

Budget: अजित पवारांच्या निधनाची चौकशी, ९ लाख कोटींचं कर्ज अन्...; 'हे' मुद्दे महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तापवणार!

SCROLL FOR NEXT