china crisis sakal
ग्लोबल

China:‘ड्रॅगन’ चे सैनिक युद्धासाठी सज्ज!

चीनचा तैवानला इशारा ; परकी शक्तींचा हस्तक्षेप चिरडून टाकू

सकाळ डिजिटल टीम

बीजिंग - तैवानच्या नजीक सलग तीन दिवस मोठा युद्धसराव केल्यानंतर, ‘आम्ही लढण्यासाठी तयार आहोत,’ असा इशारा चीनच्या लष्कराने आज दिला आहे. तैवानच्या अध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या अमेरिका दौऱ्यानंतर चीनने संतप्त होत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.

चीनने तैवानला इशारा देताना मागील तीन दिवस मोठा युद्धसराव केला होता. यामध्ये त्यांनी तैवानच्या हवाई हद्दीजवळून लढाऊ विमानांची अनेक उड्डाणे केली होती. तैवानच्या सागरी हद्दीनजीक युद्धनौकाही आणून ठेवल्या होत्या.

तैवान हा चीनचाच भाग आहे, हा आपला दावा जगाने मान्य करावा अशी इच्छा असलेल्या चीनला तैवानने इतर देशांशी स्वतंत्रपणे राजकीय संबंध निर्माण करावेत, हे मान्य नाही. त्यामुळेच इंग-वेन यांच्या दौऱ्यानंतर चीनने तीव्र नाराजी व्यक्त करत युद्धसराव घेतला होता.

या युद्धसरावानंतर,‘कोणत्याही क्षणी युद्ध करण्यासाठी आमची सर्व संरक्षण दले सज्ज आहेत. तैवानचा स्वातंत्र्याचा दावा आणि परकी शक्तींचा हस्तक्षेप आम्ही चिरडून टाकू,’ असे चीनच्या लष्कराने जाहीर केले आहे. अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहाच्या तत्कालीन अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यानंतर चीनने अशाच प्रकारचा युद्ध सराव घेतला होता. मात्र, यावेळी त्यांची व्याप्ती मोठी होती.

युद्धसरावा दरम्यान चीनने तैवानची सागरी आणि हवाई कोंडी केली होती. तैवानचा ताबा मिळविण्यासाठी चीनला सैन्यबळाचा वापर करावा लागल्यास ते याच मार्गाचा पुन्हा वापर करू शकतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या सरावादरम्यान चिनी हवाई दलाच्या शँडोंग या लढाऊ विमानांनी तैवान भोवती घिरट्या घातल्या होत्या. तैवानचा ताबा घेण्यासाठी चीनने लष्कराचा वापर केल्यास इतर देशांना हस्तक्षेप करण्यापासून रोखण्यासाठी या विमानांचा वापर होऊ शकतो, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

चीनची वर्तणूक एका शक्तिशाली देशासारखी नाही. माझ्या अमेरिका दौऱ्याचे निमित्त करून चीनने युद्ध सराव सुरु केला आणि तणावाचे वातावरण निर्माण केले आहे. चीनचे असे वागणे म्हणजे त्यांनी युद्धाच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.

- त्साई इंग-वेन, अध्यक्षा, तैवान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China Economic Crisis : चीनच्या अर्थव्यवस्थेची दोन टोके; तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती, मात्र बेरोजगारी आणि घसरत्या गुंतवणुकीमुळे आर्थिक आव्हाने कायम

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांचा CRPF चौकीवर गोळीबार; तीन जवान जखमी

Latest Marathi News Live Update : वाशिम जिनिंगमध्ये उघड्यावर साठवून ठेवलेल्या दहा हजार क्विंटल कापसाला आग

Ajit Pawar Memorial : दहा हजार पणत्यांच्या प्रकाशात उजळल्या अजितदादांच्या आठवणी; बारामतीकर भावूक

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांच्या एकाच वाक्याने पुन्हा चर्चांना उधाण.

SCROLL FOR NEXT