India-China  esakal
ग्लोबल

UNSC: भारताच्या प्रस्तावाला चीनचा पुन्हा खोडा; साजिद मीरला जागतीक दहशतवादी घोषित करण्यापासून रोखलं!

साजिद मीरचा मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यात हात असल्याचं समोर आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

युनायटेड नेशन्स : संयुक्त राष्ट्रांमध्ये भारतानं मांडलेल्या एका प्रस्तावाला चीननं पुन्हा एकदा विरोध दर्शवला आहे. मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यात हात असलेला दहशतवादी साजिद मीर याला जागतीक दहशतवादी घोषीत करा असा प्रस्ताव भारत आणि अमेरिकेनं संयुक्तपण मांडला होता, हा प्रस्ताव चीननं ब्लॉक केला आहे. (China blocks proposal by India and US at United Nations to designate LeT terrorist Sajid Mir)

साजिद मीर हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैय्यबाचा सदस्य आहे. त्याचा 26/11च्या मुंबई हल्ल्यामध्ये हात असल्यानं तो भारताला हवा आहे. साजिद मीरला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील १२६७ अल कायदा मंजूर समिती अंतर्गत साजिद मीर याला ब्लॅकलिस्ट करण्यात यावं असा प्रस्ताव ठेवला होता. तसेच त्याची संपत्ती गोठवण्यात यावी तसेच त्याच्या जगभरातील प्रवासावर बंदी घालण्यात तसेच त्याला शस्त्रबंदी करण्यात यावी अशी मागणी भारतानं केली होती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात देखील चीननं साजिद मीर या दहशतवाद्याला जागतीक दहशतवादी घोषित करण्याचा भारत आणि अमेरिकेचा संयुक्त प्रस्ताव रोखून ठेवला होता. पण आता चीननं हा प्रस्ताव ब्लॉक केला आहे.

मीर हा भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आहे. तसेच 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील त्याच्या भूमिकेसाठी अमेरिकेनं त्याच्या डोक्यावर 5 दशलक्ष डॉलरचं इनाम ठेवला आहे.

जूनमध्ये, मीरला पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयानं दहशतवादासाठी वित्तपुरवठा केल्याप्रकरणी 15 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. यापूर्वी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी मीरचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता, परंतु अमेरिकेनं त्यावर विश्वास ठेवला नाही उलट त्याच्या मृत्यूचा पुरावाच पाकिस्तानकडं मागितला. गेल्या वर्षीच्या शेवटी पाकिस्तानच्या FATFच्या मूल्यांकनात हा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता.

मीर हा पाकिस्तानस्थित एलईटीचा वरिष्ठ सदस्य आहे आणि नोव्हेंबर 2008च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याच्या सहभाग होता. अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटच्या माहितीनुसार, "मीर हा हल्ल्यांसाठी एलईटीचा ऑपरेशन्स मॅनेजर होता, त्यानं हल्ल्याच्या योजना, तयारी आणि अंमलबजावणीत प्रमुख भूमिका बजावल्या आहेत,"

पाकिस्तान आणि चीनमध्ये मैत्री असल्यानं चीननं कायमचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पाकपुरस्कृत दहशतवाद्यांना काळ्या यादीत टाकण्याची यादी वारंवार रोखली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT