China Coronavirus Update esakal
ग्लोबल

Coronavirus : चिनी लोकांना कोविड निर्बंधातून मुक्त करणाऱ्या दोन महिलांची तुरुंगातून सुटका

बीजिंगमध्ये कोरोना निर्बंधांविरोधात ऐतिहासिक निदर्शनांत भाग घेतलेल्या दोन चिनी महिलांना आज प्रशासनानं सोडलं.

सकाळ डिजिटल टीम

चीनमध्ये सरकारच्या झिरो कोविड धोरणासह अनेक निर्बंधांविरोधात मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आला.

China Coronavirus Update : बीजिंगमध्ये कोरोना निर्बंधांविरोधात ऐतिहासिक निदर्शनांत भाग घेतलेल्या दोन चिनी महिलांना आज प्रशासनानं सोडलं. सुमारे चार महिन्यांच्या कोठडीनंतर या दोघींना सोडण्यात आलं.

राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सत्तेवर आले, तेव्हा एका दशकातील सर्वात मोठ्या निषेधांमध्ये दोघींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. दोन महिलांच्या जवळच्या मित्रांनी रॉयटर्सला सांगितलं की, 'नोव्हेंबरच्या उत्तरार्धात चीनमधील अनेक शहरांमध्ये निषेध सुरू झाला. निदर्शनाच्या काही दिवसांतच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.'

ह्युमन राइट्स वॉचनं अहवाल दिला की, डिसेंबरमध्ये ताब्यात घेतलेल्या चार आंदोलकांपैकी दोन महिलांचा समावेश होता. त्यांच्यावर हिंसाचार भडकावण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. यामध्ये पाच वर्षांपर्यंतची शिक्षा आहे.

काओनं जारी केला व्हिडिओ

चीनचं सुरक्षा मंत्रालय आणि बीजिंग पब्लिक सिक्युरिटी ब्युरोनं अद्याप या प्रकरणी प्रतिक्रिया कोणतीही दिलेली नाही. यापूर्वीच्या अटकेबाबतही त्यांनी भाष्य केलं नाही. ताब्यात घेण्याच्या काही वेळापूर्वी 'काओ' या महिलेनं स्वत:हून मदत मागतानाचा व्हिडिओ बनवला होता. ही क्लिप नंतर मित्रांनी प्रसिद्ध केली आणि मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन प्रसारित झाली. यामध्ये पोलिसांनी जबरदस्तीनं तिला अटक केल्याची चर्चा होती.

झिरो कोविड धोरणाला विरोध

चीनमध्ये सरकारच्या झिरो कोविड धोरणासह अनेक निर्बंधांविरोधात मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आला. देशभरात शेकडो लोक रस्त्यावर उतरले आणि अनेकांनी त्यांच्या असंतोषाचं प्रतीक म्हणून पोस्टर जाळलं. यानंतर पोलिसांनी चौकशी करून डझनभर लोकांना ताब्यात घेतलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT