China Rain News
China Rain News esakal
ग्लोबल

चीनमध्ये मुसळधार पाऊस; १५ जणांचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत

पीटीआय

बीजिंग : दक्षिण चीनमध्ये मुसळधार पावसामुळे (Rain) झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तीन जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. चीनची (China) अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआने आपल्या वृत्तात वूपिंग काउंटीच्या माहिती कार्यालयाच्या हवाल्याने सांगितले, की फुजियान प्रांतात भूस्खलनामुळे दोन इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. यात ८ जणांचा मृत्यू झाला. सीसीटीव्ही या राष्ट्रीय वाहिनीने आपल्या वृत्तात म्हटले आहे, की युन्नान प्रांतात पाच जणांचा मृत्यू झाला असून तिघे बेपत्ता झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले, की गुआंगशी प्रांतात शिंचेंग काउंटीत शुक्रवारी पुराच्या पाण्याबरोबर तीन मुले वाहून गेले. यातील दोघांचा मृत्यू आणि एकाला वाचवण्यात यश आले. (China Fifteen People Died Due To Flood, Heavy Rain Hit Southern Part)

रस्ते, पुल जमीनदोस्त अन् वीजपुरवठा खंडित

चक्रीवादळामुळे युन्नान प्रांतातील क्युबेई काऊंटीत रस्ते, पुल, दूरसंचार व वीजपुरवठा प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले आहे. हे ठिकाण व्हिएतनाम सीमेपासून १३० किलोमीटर दूर आहे. वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. लोकांना ये-जा करताना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या वतीने मदत दिली जात आहे.

वूपिंग काउंटीत मुसळधारी पाऊस

शिन्हुआने आपल्या वृत्तात म्हटले आहे, की फुजियानमध्ये एका फॅक्टरीच्या डबरीत पाच मृतदेह आणि एका रहिवाशी इमारतीच्या राडारोड्यातून तीन मृतदेह काढण्यात आले. गुरुवारी संध्याकाळपासून वूपिंग काउंटीमध्ये पाऊस सुरु आहे. ऑनलाईन शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत रस्त्यांवर माती मिश्रित पाणी साचलेले दिसत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांचा काही भाग वाहून गेल्याचे वृत्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT