wang-yi sakal
ग्लोबल

चीनचे परराष्ट्रमंत्री अफगाणीस्तानमध्ये, तालिबान सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच घडामोडी

अफगाणिस्तानात सहावीपुढील वर्गात मुलींना प्रवेश न देण्याचा फतवा जारी करून तालिबानने वचन मोडल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाकडून टीका केली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

काबूल : चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांचे अफगाणिस्तानातील तालिबानी सत्ताधीशांच्या भेटीसाठी आज अचानक काबूलमध्ये आगमन झाले. अफगाणिस्तानात सहावीपुढील वर्गात मुलींना प्रवेश न देण्याचा फतवा जारी करून तालिबानने वचन मोडल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाकडून टीका केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर, वांग यी यांनी अचानक अफगाणिस्तानला भेट दिली. ते तालिबानी नेत्यांशी राजकीय संबंध, आर्थिक व दळणवळण सहकार्यासह विविध मुद्यांवर चर्चा करतील, असे वृत्त अफगाणिस्तानच्या ‘बख्तार न्यूज एजन्सी’ने दिले.

अमेरिका व नाटोविरुद्धच्या २० वर्षांच्या संघर्षांनंतर गेल्या वर्षी तालिबानने सत्ता काबीज केल्यापासून अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था खुली करण्यासाठी, राजवटीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळविण्यासाठी तालिबानकडून प्रयत्न होत आहेत. चीनने तालिबान सरकारला मान्यता देण्यात रस दाखविला नाही.

मात्र, तालिबानवर थेट टीका करण्याचेही चीनने टाळले आहे. तालिबानकडून मुली व महिलांना शिक्षण, काम नाकारून दडपशाही केली जात असतानाही चीनने तालिबानवर टीका केलेली नाही. चीनने आपला दूतावास सुरूच ठेवला आहे.

परदेशातील मंत्र्याचा प्रथमच दौरा

आंतरराष्ट्रीय समुदायाकडून अफगाणिस्तानातील वांशिक अल्पसंख्याक, महिलांचे हक्क अबाधित ठेवण्याचे आवाहन तालिबान सरकारला केले जात आहे. या पार्श्वभूमीवर तालिबान सत्तेवर आल्यापासून चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्या रूपाने एखाद्या देशाच्या मंत्र्याचा हा पहिलाच दौरा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT