ग्लोबल

कार्बन उत्सर्जन कमी करणार; पर्यावरण परिषदेत चीनचे सुधारित उद्दिष्ट जाहीर

पीटीआय

बीजिंग - जागतिक पर्यावरण बदलाचा सामना करण्यासाठी चीनने २०३० पर्यंतची आपली उद्दिष्ट्ये निश्‍चित केली आहेत. यानुसार, २००५ च्या तुलनेत कार्बनचे उत्सर्जन ६५ टक्क्यांनी कमी करण्याचा निश्‍चय चीनने केला आहे. तसेच, इंधन म्हणून अजैविक इंधनाचा वापर २५ टक्क्यांनी वाढविला जाणार असल्याचेही चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी जाहीर केले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पॅरिस पर्यावरण कराराला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संयुक्त राष्ट्रे, ब्रिटन आणि फ्रान्सने संयुक्तपणे जागतिक महत्त्वाकांक्षा परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलताना जिनपिंग यांनी, पर्यावरण बदलाला आळा घालण्यासाठी चीनने महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचा दावा केला. सप्टेंबरमध्येच चीनने स्वत:साठी उद्दिष्ट्ये निश्‍चित केली होती. त्यात आता आणखी सुधारणा करण्यात आली आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि अजैविक इंधनाचा वापर  वाढविण्याबरोबरच हरित क्षेत्रामध्ये ६ अब्ज चौरस मीटरने वाढ करण्याचा,  सौर आणि पवन ऊर्जा वापराची क्षमता वाढवून ती १.२ अब्ज किलो वॉट पर्यंत नेण्याचा निर्धात जिनपिंग यांनी यावेळी व्यक्त केला. 

अमेरिका आणि चीन हे जगातील सर्वाधिक प्रदूषण निर्माण करणारे देश आहेत. पॅरीस पर्यावरण करारातून अंग काढून घेणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचा अध्यक्षीय निवडणुकीत पराभव होऊन कराराचे समर्थन करणाऱ्या ज्यो बायडेन यांचा विजय झाल्याने निर्धारित उद्दिष्टांच्या दिशेने प्रयत्न होण्याची आशा निर्माण झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. पर्यावरणाबाबतच्या २०३० पर्यंतच्या उद्दिष्टांनुसार, युरोपीय आयोगानेही हरितगृह वायूंचे उत्सर्जन ५५ टक्क्यांनी कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जगातील सर्व देशांनी कार्बन उत्सर्जन शून्यावर येत नाही, तोपर्यंत पर्यावरण आणीबाणी जाहीर करावी. पुढील पिढ्या वाचविण्यासाठी हे करणे आवश्‍यक आहे. प्रत्येक देशाने नेटाने प्रयत्न करत आपल्या पृथ्वीचा बचाव करावा. 
- अँटोनिओ गुटेरेस, सरचिटणीस, संयुक्त राष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT