Yellow Alert Google
ग्लोबल

चीनमध्ये Yellow Alert जारी ; महामार्गासह मैदानांवर बंदी

सकाळ डिजिटल टीम

कोळसा उत्पादन वाढविल्यानंतर आणि आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेत देशाच्या पर्यावरणीय रेकॉर्डवर टीका झाल्यानंतर चीनने शुक्रवारी सर्व महामार्ग आणि शाळेची मैदाने बंद केली. बीजिंगच्या नगरपालिका-स्तरीय सरकारने वायू प्रदूषणामुळे यलो अलर्ट जारी केला आहे. अशी माहिती चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने यांनी दिली आहे. गुरुवारी दुपारी चार वाजल्यापासून हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. या घटनेवरून चीन सध्या प्रदूषणाच्या बाबतीत किती धोकादायक परीस्थितीतून जात आहे हे स्पष्ट होते.

चीनच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बीजिंग आणि आजूबाजूच्या परिसरात बुधवार ते शनिवारपर्यंत हवेचे प्रदूषण खूप वाढणार आहे. शुक्रवारी, चीनच्या उत्तरेकडील भागात आकाश काळ्या ढगाने व्यापून गेले. यामुळे 200 मीटरपेक्षा अंतरावरील काहीही दिसत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. चीनमधे सर्वात गंभीर वायू प्रदूषणासाठी इशारा म्हणून रेड अलर्ट जारी करण्यात येतो. यात सुरवातीला निळा, पिवळा आणि नारंगी रंगात हा इशारा हवामान खात्याकडून दिला जातो.

कोळसा वापर महागात

काही महिन्यांपासून चीनला वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. वीज पुरवठ्याअभावी आपले कारखाने बंद करावे लागले होते. यावर पर्याय म्हणून कोळसा उत्पादनात एक दशलक्ष टनांपेक्षा जास्त वाढ केली. जेणेकरून विजेची कमतरता भासणार नाही. या आठवड्याच्या सुरुवातीलाच चीनने हि माहिती दिली होती.

बँकॉक पोस्टनुसार, चीन हा जगातील सर्वात मोठा हरितगृह वायू उत्सर्जित करणारा देश मानला जातो. येथील बहुतांश उद्योग कोळशावर अवलंबून असल्याने कार्बन उत्सर्जन अंत्यंत उंच पातळीवर आहे. कोळशाच्या उत्पादनात वाढ केल्याने प्रदूषणात वाढ झाल्याचे चीनच्या शहर प्राधिकरणाच्या हवामान खात्याने सांगितले. यामुळे काळ्या ढगाचे जाड थर (प्रदूषण करणारी हवा) वातावरणात तयार झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT