ग्लोबल

अंतराळवीरांच्या मदतीसाठी चीनच्या मालवाहू यानाचे यशस्वी उड्डाण

सकाळ डिजिटल टीम

बीजिंग: चीनच्या तियांगगॉंग अंतराळ स्थानकाला साहित्य पुरवण्यासाठी आणि अंतराळवीरांना मदत करण्यासाठी आज मालवाहू यानाने यशस्वी उड्डाण केले. तियानझोऊ-३ असे मालवाहू यानाचे नाव असून ते दुसऱ्या अंतराळ मोहिमेच्या तयारीचा भाग म्हणून ओळखले जाते. हैनन प्रांतातील वेनचांग प्रक्षेपण केंद्रातून लॉग मार्च-७ वाय फोर रॉकेटच्या मदतीने तियानझोऊ-३ ने उड्डाण केले.

सुमारे सहा टन साहित्य घेऊन उड्डाण केलेले तियानझोऊ-३ हे यान तियांगगॉंग अंतराळ स्थानकावरील तिनाहे आणि तियानझोऊ-२ यांच्याशी संयोग करेल. अंतराळस्थानकाची बांधणी आणि तंत्रज्ञान निश्‍चिती टप्प्यांतील तियानझोऊची पाचवी अंतराळ मोहीम आहे. यानातून तीन अंतराळवीरांसाठीचे साहित्य, अतिरिक्त अंतराळ वेशभूषा, निर्मिती साहित्य आणि इंधनाचे वहन करण्यात येत आहे. ‘सीएमएसए’ ने म्हटले की, अंतराळ स्थानक तियानहे हे कोअर मॉड्यूलच्या मागील आणि खालच्या बाजूची जागा तियानझोऊ-३ मालवाहू यान आणि १३ मानवयुक्त अंतराळ यान उतरवून घेण्यासाठी सज्ज झाले. शेनझोऊ-१३ यानाला पुढील महिन्यात ३ अंतराळवीरांसह सोडण्यात येणार आहे.

शेनझोऊचे पथक सहा महिने राहणार

शेनझोऊ-१३ चे पथक अंतराळ स्थानकावर सहा महिने राहण्याची शक्यता आहे. मागील अंतराळवीराच्या तुलनेत हा काळ दुप्पट असणार आहे. शेनझोऊ-१३ मोहिमेसाठी तीन सदस्यीय अंतराळवीरात एक महिला देखील असणार आहे. २००३ नंतर चीनने ११ जणांना अवकाशात पाठवले असून त्यापैकी केवळ दोनच महिलांचा लियू यांग आणि वांग यापिंग यांचा समावेश आहे.

तियानहे मोड्यूलचे स्थानक

तियानहे पद्धतीचे चीनचे अंतराळ स्थानक हे पृथ्वीपासून ३८० किलोमीटर अंतरावर आहे. टी आकाराच्या अंतराळ स्थानकात मध्यभागी एक कोअर मोड्यूल असून प्रत्येक बाजूला लॅब कॅप्सूल आहे. प्रत्येक मोड्यूलचे वजन सुमारे २० टन असून संपूर्ण अंतराळ स्थानकाचे वजन सुमारे ६६ टनपेक्षा अधिक आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी जून महिन्यात अंतराळ स्थानकात काम करणाऱ्या तीन अंतराळीवरांशी संवाद साधला होता. तेव्हा त्यांनी हे स्थानक चीनसाठी मैलाचा दगड असून हा एक महत्त्वाकांक्षी अंतराळ कार्यक्रमाचा भाग असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT