china missile esakal
ग्लोबल

चीन हायपरसॉनिक मिसाइलमधुनही करु शकतो अणवस्त्र हल्ला...

चीनमुळे अवघ्या जगाचं टेन्शन वाढणार? अणुबाँब टाकायला आता सक्षम

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : चीनमधील (china) 'वुहान' शहरातून कोरोना संसर्गाचा (coronavirus) जन्म झाला..आणि जगभरात हाहाकार माजला. पण आता भारताचा (India) प्रमुख शत्रू चीनने अवघ्या जगाचं टेन्शन वाढवणारं काम केलं आहे. चीनने अंतराळातून जमिनीवर अणुबॉंब (hypersonic missile) डागण्याची चाचणी केली आहे. उत्तर कोरिया (north korea) , रशिया (russia) आणि अमेरिका (USA) देखील हायपरसोनिक मिसाईलच्या (Hypersonic missile) निर्मितीसाठी प्रयत्न करत आहे. या देशांपूर्वीचं चीननं हायपरसोनिक मिसाईल विकसित करुन जगाचं टेन्शन वाढवलं आहे. चीनचं हायपरसोनिक मिसाईल जगातील इतर देशांसह भारताचंही टेन्शन वाढलंय..

अमेरिकेसह भारताचं टेन्शन वाढलं...

चीनच्या हायपरसोनिक मिसाईलमुळे अमेरिकेसह भारताचं टेन्शन वाढलंय. चीन आधीच लडाखमध्ये दादागिरी दाखवत आहे. तिथे त्यांनी सैन्य आणि शस्त्रास्त्रांची जमावजमव केली आहे. चीनच्या हायपरसोनिक मिसाईलचा सामना करण्यासाठी भारताकडे देखील मिसाईल असणं आवश्यक आहे. भारत देखील अमेरिका, चीन आणि रशियानंतर हायपरसोनिक मिसाईल विकसीत करत आहे. डीआरडीओनं ओडिशाच्या बालासोरमध्ये हायपरसोनिक टेक्नॉलॉजी डिमॉन्स्ट्रेटर वेईकल टेस्ट केली आहे. डीआरडीओचे हे तंत्रज्ञान ध्वनीच्या सहापट वेगानं हल्ला करु शकतं. डीआरडीओ पुढील पाच वर्षात हायपरसोनिक मिसाईल विकसित करु शकतं. हायपरसोनिक मिसाईल अणवस्त्रासहीत मारा करत आहेत की अणवस्त्राशिवाय हल्ला करत आहेत याचा अंदाज दुसऱ्या राष्ट्रांना येणार नाही.

अमेरिकेतील संरक्षण विषयक प्रसिद्ध वेबसाईट द ड्राईव्हच्या रिपोर्टनुसार चीनची ही चाचणी यशस्वी झाली तर संपूर्ण जगावर याचे परिणाम संभवतात. चीनच्या या कारनाम्याची अमेरिकन चीनची मिसाईल दिलेल्या टार्गेटपासून 32 किमीवर पडली असली तरी अमेरिकेला पुढील धोका समजला आहे. सुरु केली आहे. चीननं अंतराळातून जमिनीवर अणवस्त्र (अणुबॉंम्ब) डागण्याची चाचणी केली आहे. चीननं त्यांच्या लाँग मार्च रॉकेटच्या मदतीनं हायपरसोनिक मिसाईल अंतराळातून जमिनीवर सोडली. मिसाईलनं पृथ्वीला प्रदक्षिणा घातली त्यानंतर ती मिसाईल दिलेल्या टार्गेटवर डागण्यात आली. संरक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते आता अंतराळातून चीन जमिनीवर कुठेही अणवस्त्र डागू शकतो यामुळं जगाचं टेन्शन वाढलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT