china 
ग्लोबल

बापरे! चीनमध्ये आता नवा व्हायरस; एकाच्या मृत्यूने खळबळ

वृत्तसंस्था

पेइचिंग : चीनमधील वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असतानाच आता चीनमध्ये एका नव्या व्हायरसमुळे एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियामध्ये या व्हायरसवरून विविध प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

चीनमधीन युनान प्रांतात हंता व्हायरसमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. बसमधून शाडोंग प्रांतात जात असताना त्या व्यक्तीचा बसमध्येच मृत्यू झाला आहे. हंता व्हायरसचा तो पॉझिटिव्ह रुग्ण होता. त्याच्यासोबत बसमधून प्रवास करणाऱ्या अन्य 32 जणांचीही चाचणी करण्यात येणार आहे. 

चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने हे वृत्त दिल्यानंतर खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिा येत असून, कोरोनाप्रमाणे हा व्हायरसही जागतिक रोग बनू नये अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. एकाने तर चीन जनावरांना खाणे जोपर्यंत बंद करत नाही तोपर्यंत असे व्हायरस निर्माण होतच राहणार असे म्हटले आहे. 

काय आहे हंता व्हायरस?
हंता व्हायरस हा कोरोनाप्रमाणे धोकादायक नाही, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. हा व्हायरस हवेतून पसरत नाही. पण, उंदीर किंवा वटवागुळाच्या संपर्कात आल्यानंतर तो नागरिकांमध्ये पसरतो. निरोगी व्यक्तीही या व्हायरसचा शिकार होऊ शकतो. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला याची लागण होत नाही. ताप, डोकेदुखी, अंगदुखी, पोटात दुखणे, उलटी, जुलाब अशी या रोगाची लक्षणे आहेत. उपचारात उशीर झाल्यास मनुष्याचा फुफ्फुसामध्ये पाणी जमा होण्यास सुरवात होते आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ritu Tawde: झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू; '२५ वर्षांचा हिशेब काढू', रितू तावडेंचा विरोधकांना इशारा

FIFA World Cup 2026 मधून कोण होणार आऊट? ब्राझीलसमोर हालंडचे आव्हान, तर इंग्लंड संघ मेक्सिकोला भिडणार!

Marathi Live Updates : मुंबई गोवा महामार्गावर वाकण ते नागोठणे दरम्यान भीषण वाहतूक कोंडी

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाकण-नागोठणे दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा

IND A vs SL A, Test: सुदर्शनचं शतक, तर गुरनूर ब्रारच्या १० विकेट्स, भारताचा श्रीलंकेवर चौथ्याच दिवशी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT