Antony Blinken sakal
ग्लोबल

Antony Blinken : चीनची चर्चेची हवी तयारी

जी-७ समुहाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ब्लिंकन जपानच्या दौऱ्यावर आले आहेत. चीनबरोबरील अमेरिकेची चर्चा ठप्प झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

जी-७ समुहाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ब्लिंकन जपानच्या दौऱ्यावर आले आहेत. चीनबरोबरील अमेरिकेची चर्चा ठप्प झाली आहे.

टोकियो - चीनबरोबरील चर्चेच्या आघाडीवर प्रगती करणे शक्य होईल अशी अमेरिकेला अपेक्षा आहे, पण त्यासाठी चीनने स्वतः तशी इच्छा स्पष्ट करायला हवी, असे प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी केले.

जी-७ समुहाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ब्लिंकन जपानच्या दौऱ्यावर आले आहेत. चीनबरोबरील अमेरिकेची चर्चा ठप्प झाली आहे. याविषयी विचारले असता ते म्हणाले की, गेल्या वर्षी उभय देशांचे प्रमुख ज्यो बायडेन आणि शी जिनपिंग यांच्यातील बैठकीत चर्चेची द्वारे खुली ठेवण्यावर भर देण्यात आला होता. त्यादिशेने प्रगतीची आम्हाला अपेक्षा आहे.

बैठकीबाबत ब्लिंकन म्हणाले की, कारुईजावा येथे मी इतर मंत्र्यांशी चर्चा केली. त्यावरून तैवानबाबत आम्ही घेत असलेल्या भूमिकेवर सुस्पष्ट एकमत आहे. चीनबाबत चिंतेचे जे मुद्दे आहेत आणि त्याचे निराकरण व्हावे म्हणून आम्ही काय प्रयत्न करीत आहोत याविषयी बैठकीत अप्रतिम अभिसरण झाले.

मॅक्रॉन यांचा मतभेदाचा मुद्दा

चीनवरून जी-७ समूहात मतभेद असल्याचे संकेत मिळाले आहेत. यात प्रामुख्याने फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी स्पष्टपणे मुद्दा मांडला आहे. या पार्श्वभूमीवर चीनच्या आक्रमक कृत्यांवरून जी-७ समूह चिंतित असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 TRADE: नवा कोच, नवा प्लान! हार्दिक पांड्याच्या ट्रेडवरून CSK चं विधान; ऋतुराज, MS Dhoni यांच्याशी चर्चा, नेमकं काय शिजतंय?

Gold Rate Today: सोन्याच्या दरात भडका! 7 दिवसांत 11 हजारांनी महाग; आज तर तब्बल... मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव किती?

Marathi News Live Updates: कंगना रणौत यांचा राहुल गांधींवर आरोप; संसद चालू न देण्याचा विरोधकांवर ठपका

“त्यांनी मला जोरात मारलं अन् मी रडू लागले”; नाना पाटेकरांनी अभिनेत्रीला मारलेली कानशि‍लात

Abhijit Dipke Protest: दीपकेंविरोधात उपोषण करणाऱ्या दोघांचीही प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल करताच...

SCROLL FOR NEXT