Covid Omicron Variant esakal
ग्लोबल

चीनला धास्ती! देशात आढळला कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण

सकाळ डिजिटल टीम

ओमिक्रॉनमुळं कोव्हिड रुग्णसंख्या वाढण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलीय.

बीजिंग : कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनमुळं (Covid Omicron variant) कोव्हिड रुग्णसंख्या वाढण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलीय. यामुळं जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. जगभरात आतापर्यंत डेल्टा व्हेरियंटचा प्रभाव जास्त दिसून येतोय. ओमिक्रॉनचा पहिला बळी यूकेमध्ये झाला आहे. दरम्यान, डेल्टा व्हेरियंटच्या उद्रेकाने चीनमध्ये ओमिक्रॉनचं पहिलं प्रकरण समोर आलंय. बाधित व्यक्ती उत्तरेकडील तियानजिन शहरातील (Tianjin City) आहे.

ग्लोबल टाइम्सच्या अहवालात सोमवारी चीनची एजन्सी सीजीटीएन-टीव्हीच्या अहवाल्यानं म्हटलंय, की उत्तर चीनमधील तियानजिन शहरात ओमिक्रॉनचं पहिलं प्रकरण समोर आलंय. संक्रमित नुकतेच दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) परतले होते. त्याला तत्काळ वेगळं करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, रुग्ण आणि त्याच्या प्रकृतीबाबत अजून काहीही सांगण्यात आलेलं नाही. चीनच्या (China) झेजियांग प्रांतात कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटच्या 'सब-लीनिएज AY.4' या नवीन जातीची प्रकरणं आढळून आली आहेत. या प्रांतात स्थानिक पातळीवर संसर्गाची 138 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर, पूर्व प्रांतातील लोकांना प्रवास करण्यास मनाई करण्यात आलीय.

जीनोम सिक्वेन्सिंग आणि विषाणू अभ्यासातून असं दिसून आलंय, की तिन्ही शहरांमध्ये संसर्गाची प्रकरणं डेल्टा स्ट्रेन सब लीनिएज AY.4 मुळं झाली होती, जी नोबेल कोरोना विषाणूपेक्षा जास्त संसर्गजन्य मानली जाते. चीनमध्ये डेल्टा व्हेरियंटचा नवीन स्ट्रेन आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. झेजियांग प्रांताचे मुख्यालय असलेल्या हांगजोऊ येथून मिळालेल्या अहवालानुसार, प्रांतातील 138 प्रकरणांपैकी 44 प्रकरणं निंग्बोमधील, 77 प्रकरणं शाओक्सिंग आणि 17 प्रकरणं हांगजोऊमधील आहेत. तर, पूर्व प्रांतातील लाखो लोकांच्या प्रवासावर अधिकाऱ्यांनी बंदी घातलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: महायुतीत जागावाटपावरून तणाव! ‘नो कॉम्प्रोमाइज’ मोडमध्ये शिंदेसेना; ७ जागांसाठी आक्रमक भूमिका घेत भाजपवर दबाव

SRH vs RCB Live: विराट कोहलीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड! गतविजेत्यांनी मोठा डाव टाकला अन् किंग कोहली जगात 'सुपर डुपर' ठरला

NEET Paper Leak प्रकरणात मोठा खुलासा! भौतिकशास्त्राचा पेपर लीक करणारी मुख्य सूत्रधार मनिषा हवालदार; कसा आखला डाव?

Hasan Mushrif Sharad Pawar : हसन मुश्रीफांनी संपलेला विषय पुन्हा काढला, "शरद पवारांना आमदार प्रेमापोटी भेटले असतील"; संजय शिरसाठांवरही केलं भाष्य

Mumbai Health Alert: साखर कमी खाल्ली तरी मधुमेह का होतो? मुंबईतील वाढत्या केसेसमागचं विज्ञान आणि जीवनशैलीतील धक्कादायक कारणं

SCROLL FOR NEXT