China-Russia
China-Russia Sakal
ग्लोबल

China-Russia : तैवान हा चीनचाच भाग - पुतीन

सकाळ वृत्तसेवा

बीजिंग : तैवान हा चीनचाच भाग असल्याचे सांगत रशियाने आज चीनच्या ‘वन चायना’ धोरणाला पाठिंबा जाहीर केला. तैवानच्या स्वातंत्र्याला रशियाचा विरोध आहे, असे रशिया आणि चीन यांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे. युक्रेन प्रश्‍नावर चीनचा पाठिंबा मिळविण्यासाठी रशियाने ही खेळी केल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. (Russia China relation)

हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्‌घाटनच्या कार्यक्रमासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन चीनला आले आहेत. त्यांनी आज चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची आज भेट घेतली. युक्रेनच्या सीमेवर रशियाने सैन्य तैनात केल्यावरून मोठा तणाव निर्माण झाला असतानाही पुतीन यांनी चीन दौऱ्याला महत्त्व दिले आहे. चीन आणि रशिया यांच्यातील मैत्री म्हणजे एकमेकांना सन्मानाने सहकार्य करण्याचे उदाहरण असल्याचे पुतीन यांनी या भेटीनंतर सांगितले.

या भेटीनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले. परस्परांच्या हिताला बाधा आणली जाणार नाही आणि एकमेकांच्या सार्वभौमत्त्वाचा आदर करण्याचे मान्य करतानाच, रशियाने ‘वन चायना’ धोरणाला पाठिंबा व्यक्त करत तैवान हा चीनचाच एक भाग असल्याचे मान्य केले आहे, असे निवेदनात म्हटले आहे. हाँगकाँग आणि तैवान प्रकरणी अमेरिका ढवळाढवळ करत असल्याचा आरोप चीनने केला आहे, तर युक्रेनप्रश्‍नी अमेरिकेमुळेच पूर्व युरोपात अशांतता निर्माण झाल्याचा दावा रशियाने केला आहे.

मैत्रीला मर्यादा नाही

चीन आणि रशियामधील मैत्रीला कोणत्याही मर्यादा नाहीत, सहकार्य करण्यासाठी कोणतेही क्षेत्र वर्ज्य नाही, असे या निवेदनात म्हटले आहे. अवकाश, संरक्षण आणि इतर अनेक क्षेत्रांत सहकार्य करणार असल्याचेही दोन्ही देशांनी म्हटले आहे. या दोन्ही बड्या देशांचे अमेरिकेबरोबर वाद असल्याने त्यांचे एकत्र येणे अमेरिकेच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठीच असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘मराठा आंदोलनामुळे दरदिवशी मोदींची सभा’

आपण सगळे भारतीय आहोत!

लस, गैरसमज आणि आव्हान!

Neeraj Chopra : अवघे 2 सेंटीमीटर... नीरज टॉप स्पॉटपासून थोडक्यात हुकला

जगणं शिकवणारा बापमाणूस!

SCROLL FOR NEXT