India China clash in Arunachal esakal
ग्लोबल

Tawang Clash: भारत-चीनच्या सैन्य झटापटीनंतर LACवरची स्थिती काय? चीननं दिली माहिती

राजनाथ सिंह यांनी देखील आज लोकसभेत याबाबत अधिकृत माहिती दिली.

सकाळ डिजिटल टीम

Tawang Clash : अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये झालेल्या भारत-चीनच्या सैन्य झटापटीवर आता चीनकडून स्पष्टीकरण आलं आहे.

९ डिसेंबर रोजी झालेल्या या झटापटीत दोन्हकडचे सैनिक किरकोळ जखमी झाले होते. दोन वर्षांपूर्वी गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजीत संघर्षानंतर या प्रकाराची पुनरावृत्ती झाली. (China says situation stable on India border after reports of clashes)

तवांग सेक्टरमध्ये झालेल्या भारत-चीन सैन्याच्या झटापटीत भारताचे सुमारे ३० सैनिक किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकाराचा कालच खुलासा झाला, पण यानंतर लाईन ऑफ अॅक्च्युल कन्ट्रोलवर (LAC) काय स्थिती आहे, याची ताजी माहिती आता समोर आली आहे. चीननं आपल्या अधिकृत निवेदनात याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत या घटनेबाबत खुलासा केला. या घटनेला दुजोरा देताना चीनच्या सैन्यानं तवांगमध्ये भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला. चिनी सैन्याच्या घुसखोरीचा भारताच्या सैन्याने निडरतेने प्रतिकार केला.

यावेळी दोन्हीकडच्या सैन्यात संघर्ष झाला. भारतीय सैन्याने वीरतेने शत्रुच्या सैन्याला परत जाण्यास भाग पाडलं. या संघर्षात दोन्हीकडचे सैनिक जखमी झाले. मात्र एकाही सैनिकाचा मृत्यू झाला नसून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही, असंही त्यांनी सांगितलं.

चीननं म्हटलंय की, भारत-चीन सीमेवरील स्थिती आता स्थिर आहे. एएआयनं एफपी न्यूज एजन्सीच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे.

हे ही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT