covid 19 updates esakal
ग्लोबल

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

यांग हे एक अनुभवी शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी सीएनबीजीमध्ये लस बनवणाऱ्या टीमचं नेतृत्व केलं होतं. या टीमनेच सिनोफार्मा बीबीआयबीपी-कोरवी व्हॅक्सिन बनवली होती. चीनची ही पहिली कोरोना व्हॅक्सिन होती.

संतोष कानडे

नवी दिल्लीः कोरोना महामारीमध्ये चीनने जी पहिली लस बनवली होती ती बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बरखास्तीची कारवाई करण्यात आलेली आहे.

चायना नॅशनल फर्मास्युटिकल ग्रुपची व्हॅक्सिन सहाय्यक कंपनी चायना नॅशनल बायोटेक ग्रुपचे (सीएनबीजी) अध्यक्ष यांग जियाओमिंग यांना कायद्याचं उल्लंघन केल्याच्या कारणावरुन नॅशनल पीपल्स काँग्रेसमधील त्यांना सदस्य पदावरुन हटवलं आहे.

यांग यांची बरखास्ती ही भ्रष्टाचारविरोधी अभियानाचा एक भाग असल्याचं बोललं जात आहे. चीनमधील आरोग्य यंत्रणेतील ही सर्वात मोठी कारवाई समजली जातेय. मागच्या काही वर्षांपासून राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी देशात भ्रष्टाचारविरोधी मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच हा एक भाग असल्याचं सांगितलं जात आहे.

६२ वर्षीय यांग हे एक अनुभवी शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी सीएनबीजीमध्ये लस बनवणाऱ्या टीमचं नेतृत्व केलं होतं. या टीमनेच सिनोफार्मा बीबीआयबीपी-कोरवी व्हॅक्सिन बनवली होती. चीनची ही पहिली कोरोना व्हॅक्सिन होती.

चीनच्या या पहिल्या लशीला सार्वजनिक उपयोगाकरीता मान्यता देण्यात आलेली होती. यांग यांना सप्टेंबर २०२० मध्ये उपलब्धीसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

मालिकेत एकमेकांच्या तालावर नाचणाऱ्या सायली आणि प्रियाने चक्क कोळीगीतावर लगावले ठुमके; व्हिडिओ व्हायरल

Gas Cylinder Scam : ‘LPG सिलेंडर हवा आहे का?’ अशा प्रकारच्या 'या' 5 व्हॉट्सॲप मेसेजपासून सावध; एका क्लिकने बँक खाते होऊ शकते रिकामे

Latest Marathi News Live Update : जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये घरगुती गॅसचा वापर

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

SCROLL FOR NEXT