PM Modi Biden Meeting  e sakal
ग्लोबल

"चीनला धडा शिकवायला हवा" असं म्हणत अमेरिकेनं घेतला भारतासाठी मोठा निर्णय

भारताला अत्याधुनिक शस्त्रांची गरज असल्याचंही अमेरिकेनं अधोरेखित केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

वॉशिंग्टन : चीनच्या विस्तारवादी भूमिकेनं जगाची डोकेदुखी वाढवली आहे. चीन कायमच छोट्या आणि दुर्बळ शेजारील देशांवर कायमच दादागिरी करत असतो. पण भारतापुढं चीनची ही खूमखुमी चालत नाही. उलट चीनला उत्तर देण्यासाठी भारत कायमच सज्ज असतो. त्यामुळं अमेरिकेनं भारताला दिलासा देत एक मोठा निर्णय घेतला आहे. (China should be taught a lesson America took a big decision for India)

अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेत राष्ट्रीय संरक्षण प्राधिकरण अधिनियमात (एनडीएए) संशोधनाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता अमेरिकेला भारतानं रशियाकडून शस्त्र खरेदीला कोणतीही अडचण नाही. यापूर्वी अमेरिकेचे खासदार रो खन्ना यांनी भारताला काटसा (CAATSA) या कायद्यांतर्गत प्रतिबंधांमधून सूट देण्याची मागणी केली होती.

खन्ना म्हणाले होते, "चीनचं वाढतं आक्रमक रुप पाहता भारताच्या पाठिशी आपल्याला उभं रहावं लागेल. यापार्श्वभूमीवर कायद्यातील संशोधन खूपच महत्वाचं आहे. तसेच मला या गोष्टींचा अभिमान वाटतोय की याला दोन्ही सभागृहांकडून मंजूरी देण्यात आली आहे.

काय आहे CAATSA कायदा?

या कायद्यांतर्गत अमेरिका आपल्या विरोधी देशांकडून शस्त्र खरेदी करणाऱ्या देशांवर निर्बंध लादतं. त्यानुसार, इराण, उत्तर कोरिया आणि रशियासोबत जे देश शस्त्र खरेदीचे व्यवहार करतात त्यांच्यावर अमेरिकेकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. दरम्यान, प्रतिनिधी सभेच्या मंजुरीनंतरही या विधेयकाचं अद्याप कायद्यात रुपांतर झालेलं नाही. या कायद्याला मान्यता देण्यासाठी तो अमेरिकेच्या संसदेतील दोन्ही सभागृहांमध्ये पारित होणं गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyadhar Anaskar : आरबीआयच्या नव्या पतधोरणामुळे सर्वसामान्यांचे कर्ज महागण्याची शक्यता; समतोल राखण्याचे बँकिंग क्षेत्रासमोर आव्हान

Beed News : बीडच्या एलसीबी पथकाचा सन्मान! अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा लावून ४५ तोळे सोने, १६०० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात धडाकेबाज कामगिरी

Sakal Karandak Competition : पुणे विभागातून ‘लाजाळू’ अंतिम फेरीत; ‘ईमान’ला द्वितीय; ‘नातीगोती’ला तृतीय क्रमांक

Delhi Building Collapse: दिल्लीत भीषण दुर्घटना! चार मजल्यांची इमारत कोसळली, गरोदर मातेसह तिघांचा मृत्यू

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सातव्या दिवशीही कायम

SCROLL FOR NEXT