china,coronavirus,covid_19, vaccine  
ग्लोबल

कोरोना वॅक्सिनसंदर्भात चिनी कंपनीने दिली गुड न्यूज!

सकाळ डिजिटल टीम

बिजींग :कोरोना विषाणूच्या संक्रमणाने जगाच्या कानाकोपऱ्यात हाहाकार माजला आहे.  सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून या महा साथीच्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक राष्ट्रांनी देशव्यापी लॉकडाउनचा निर्णय घेतला. याने आकडा आटोक्यात आणण्यात यश मिळाले असले तरी कोरोनाच्या विषाणूपासून सुटका मात्र झालेली नाही. त्यामुळे लसीशिवाय यातून आपली सुटका अशक्य असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येते. कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी अनेक देशात लसीचा शोध सुरु झाला आहे. यापूर्वी काही राष्ट्रांनी लस शोधण्यात यश आल्याचा दावाही केलाय. त्यात आता ज्या चीनमधून या महासाथीच्या रोगाची उत्पती झाली त्या चीनच्या कंपनीने लसीच्या प्रयोगाला यश आल्याचे म्हटले आहे. 

कोरोना विषाणूवर प्रतिबंधात्मक लस तयार करण्यावर काम करणाऱ्या  'सिनोवँक बायोटेक'ने यासंदर्भात सकारात्मक बातमी दिली आहे. कोविड -19 चा नायनाट करण्यास सक्षम ठरेल अशी लस तयार करण्यात आली असून सुरुवातीला क्लिनिकलमध्ये झालेल्या दोन चाचण्या यशस्वी झाल्याचा दावा या कंपनीने केलाय.  बीजिंगस्थित कंपनीने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. लसीसंदर्भात क्लिनिकलमध्ये करण्यात आलेली चाचणी पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये यशस्वी ठरली आहे, असा उल्लेख यात करण्यात आला आहे. कोरोनाविरोधातील लढ्यात रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त लस तयार आहे. 18 ते 59 वयोगटातील 743 जणांवर या लसीचा प्रयोग करण्यात आला आहे. यातील पहिल्या टप्प्यात 143 तर दुसऱ्या टप्प्यात 600 लोक स्वत:हून सहभागी झाले होते, असेही कंपनीने सांगितले आहे.  

ज्या लोकांवर चाचणी घेण्यात आली. त्यांना एक इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर 14 दिवस त्यांचे निरिक्षण करण्यात आले. या यशानंतर लसीची तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी घेण्यासाठी कंपनीने तयारी सुरु केली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाला यासंदर्भातील अहवाल पाठवण्यात येणार असून तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीतही यश मिळेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केलाय. सिनोवॅकचे अध्यक्ष आणि कार्यकारी अधिकारी  वेइदोंग यिन म्हणाले की, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील अभ्यासात मिळालेले यश हे सुनिश्चित करते की कोरोनावॅक सुरक्षित असून हे रोगप्रिकारक क्षमता वाढवण्यास उपयुक्त आहे. कोरोना विषाणूविरोधातील लढ्यात मिळालेले हे मोठे यश आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT