China Omicron Cases esakal
ग्लोबल

ओमिक्रॉनची भीती, चीनमध्ये लाखो नागरिक घरात बंदीस्त

सकाळ डिजिटल टीम

बिजींग : ओमिक्रॉन या नवीन व्हेरियंट आढळून (China Omicron Cases) आल्यानंतर चीनमधील काही शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. तियानजिन या शहरात ओमिक्रॉनचा उद्रेक होत आहे. पण, सध्या संख्या कमी आहे. तरीही कडक लॉकडाऊन (China Lockdown) घोषित करण्यात आला आहे. यापूर्वी तियानजीननजीकच्या शहरांमध्ये डेल्टाचे रुग्ण आढळून आल्याने लाखो लोकांना घरात बंदीस्त करण्यात आले आहे.

युरोपपेक्षा चीनमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या खूप कमी आहे. तरीही चीनने काही शहरांमध्ये कडक लॉकडाऊन लावले आहे. येत्या काही दिवसांत बिजींगमध्ये ऑलिक्पिक आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठीच कोरोनाचे रुग्ण झपट्याने कमी करण्यासाठी चीन प्रयत्न करताना दिसत आहे. ५० लाखांपेक्षा अधिक लोकांना घारमध्येच कैद करण्यात आले आहे. चीनमधील तियानजिनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. तर नियंत्रित भागात, प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला रेशन इत्यादी खरेदी करण्यासाठी घराबाहेर जाण्याची परवानगी आहे, तर प्रतिबंधित भागात लोकांना त्यांच्या घरातच राहावे लागेल. तियानजीन ते राजधानी बीजिंगपर्यंत बस आणि ट्रेन सेवा देखील बंद करण्यात आली आहे. शहरातील लोकांना अत्यंत महत्त्वाचे काम असेपर्यंत शहर सोडू नका, असे सांगण्यात आले आहे. याबाबत स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले आहे.

दोन जणांना ओमिक्रॉनची -

तियानजिन शहरात रविवारी 20 मुले आणि प्रौढांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. त्यापैकी किमान दोन जणांना ओमिक्रॉन या विषाणूची लागण झाली होती. यानंतर शहरात मोठ्या प्रमाणावर चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर आणखी २० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.

या शहरात लाखो नागरिक घरात बंदीस्त -

तियानजिनपासून जवळच असलेल्या शियान आणि युझोऊ या शहरांमध्ये लाखो लोक त्यांच्या घरात बंदिस्त आहेत. कारण, या शहरांमध्ये डेल्टाने धुमाकूळ घातला आहे. शियानमधील रहिवाशांना दोन आठवड्यांहून अधिक काळ लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. 13 दशलक्ष लोकसंख्येच्या शहरात सोमवारी केवळ 15 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे लवकरच निर्बंध हटविण्यात येतील. युझोऊ शहर हेनान प्रांतात आहे. सोमवारी, हेनान प्रांतात आणखी 60 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी दोन रुग्ण ओमिक्रॉनचे होते. चीनमध्ये ओमिक्रॉनची डझनहून अधिक रुग्ण नोंदवली गेली आहेत. परदेशातून परतलेल्या बहुतेक लोकांना या प्रकाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT