tank
tank 
ग्लोबल

चीनच्या सैन्य वापसीची प्रचंड गती, २०० रणगाडे घेतले मागे; भारतीय लष्करही आश्चर्यचकित

सकाळन्यूजनेटवर्क

बिजिंग- ९ महिन्याच्या आमनेसामनेच्या परिस्थितीनंतर चीनन्या पीपल्स लिबरेशन आर्मी आणि  भारतीय लष्कराने लडाख भागातून आपल्या सैनिकांना परत बोलावणे सुरु केले आहे. बुधवारी सकाळपासून पेंगोग त्सो तलावाच्या उत्तर आणि दक्षिण भागातून दोन्ही देशांच्या सैनिकांनी माघार घेण्यास सुरुवात केली आहे. उभय देशाच्या या पाऊलामुळे शांतता आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मागील वर्षाची जैसे-थ परिस्थिती निर्माण होण्यास मदत होणार आहे. 

गुरुवारी दक्षिण पेंगोग त्सो तलावाच्या भागातून चीनने २०० पेक्षा अधिक लढाऊ टँक परत बोलावले आहेत. विशेष म्हणजे चीनचे आपले सैन्य परत बोलवण्याची गती पाहून भारतही आश्चर्यचकित झाले आहे. सरकारी सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, पेंगोग त्सो भागातून बुधवारी सकाळी ९ वाजता दोन्ही देशांच्या सैनिकांनी माघार घेण्यास सुरुवात केली. नवव्या चर्चेच्या फेरीनंतर दोन्ही देशांमध्ये सैन्य माघार घेण्यास सहमती बनू शकली. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांच्या समपदस्थांशी चर्चा केली. भारताने दाखवलेल्या मजबूत निर्धारामुळेच चीन माघार घेण्यास तयार झाला. 

अखेर ट्विटर झुकलं!  मोदी सरकारने डोळे वटारताच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पडला...

चीनने माघार घेण्याची गती अत्यंत वेगवान आहे. यावरुन चीनच्या पुन्हा या भागात तैनात होण्याची गतीही स्पष्ट होते. याला लष्करी कला म्हणतात. भारताने आपल्या सैनिकांना वापस बोलावले आहे. असे असले तरी गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी भारत तयार आहे, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. लडाखमधील १५९७ किलोमीटरच्या  प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जैसे-थे परिस्थिती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. 'हिंदुस्तान टाईम्स'ने या संदर्भातीव वृत्त दिलं आहे. 

भारताने एका शक्तीशाली सैन्याला माघार घेण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे हे मोठे यश असल्याचं मानलं जात आहे. तीन दिवसात सैन्य माघार घेण्याचे मान्य झाले होते. त्यामुळे शनिवारपर्यंत दोन्ही देशांचे सैन्य माघार घेण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पेंगोग त्सो भागातील सैन्य माघार घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर पेट्रोलिंग पॉईंट १५ (गोगरा) आणि १७ (हॉट स्प्रिंग) भागातून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरु होईल. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत बोलताना दोन्ही देशांनी लडाख भागातून माघार घेण्यावर सहमती दर्शवल्याचं म्हटलं होतं. 

दरम्यान, 5 मे रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झडप झाली होती. त्यानंतर 15 जून रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये रक्तमय संघर्ष झाला. अनेक दशकानंतर पहिल्यांदाच अशी घटना घडली होती. संघर्षात दोन्ही देशांना नुकसान झाले होते. भारताचे 20 जवान शहीद झाले होते, तर चीनचे 40 सैनिक मारले गेले असल्याची माहिती भारत सरकारने दिली होती. असे असले तरी चीनने आपल्या सैनिकांच्या मृत्यूचा आकडा जाहीर केलेला नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT