China Fighter Jet esakal
ग्लोबल

China Taiwan Conflict : चीन-तैवान संघर्ष पेटला! 40 चिनी लढाऊ विमानं घुसली तैवानच्या हद्दीत

चीन आणि तैवान यांच्यात पुन्हा एकदा संघर्षाची (China Taiwan Conflict) परिस्थिती निर्माण होणार आहे.

Balkrishna Madhale

चीन तैवानला आपला भूभाग मानतो आणि त्याला कोणाचाही हस्तक्षेप नको आहे.

बीजिंग : चीन आणि तैवान यांच्यात पुन्हा एकदा संघर्षाची (China Taiwan Conflict) परिस्थिती निर्माण होणार आहे. कारण, चीनची लढाऊ विमानं (China Fighter Jet) पुन्हा तैवानच्या हद्दीत घुसखोरी करताना दिसत आहेत. ड्रॅगननं आजपासून तैवानभोवती तीन दिवसीय लष्करी सराव सुरू केलाय.

पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ईस्टर्न थिएटर कमांडनं जाहीर केलंय की, चीन इथं फक्त लष्करी सराव करत आहे. मात्र, तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन (Taiwan President Tsai Ing-wen) अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर ड्रॅगननं हा निर्णय घेतला. या निर्णयावरुन चीनचा रोष म्हणून पाहायला मिळत आहे.

चीननं लष्करी कवायती सुरू केल्या असून, तैवानच्या फुटीरतावादी आणि त्यांच्याशी संलग्न बाह्य शक्तींविरुद्ध हा एक गंभीर इशारा असणार आहे. दरम्यान, सुमारे 40 चिनी लढाऊ विमानं तैवानच्या हद्दीत दाखल झाली आहेत. तैवानच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं की, 'ते शांतपणे आणि तर्कशुद्धपणे उत्तर देतील. आम्ही वाढत्या संघर्षाला आणखी खतपाणी घालू इच्छित नाही. गेल्या 24 तासांत तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रात चिनी विमानं पाहिली आहेत. तैवानच्या आसपास 13 चिनी विमानं आणि तीन युद्धनौका सापडल्या आहेत.'

तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई यांनी बुधवारी लॉस एंजेलिसमध्ये अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाचे अध्यक्ष केविन मॅककार्थी यांची भेट घेतली. त्यामुळं चीन नाराज झाला आहे. वास्तविक, चीन तैवानला आपला भूभाग मानतो आणि त्याला कोणाचाही हस्तक्षेप नको आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT