China-Taiwan Dispute Xi Jinping Warns US Joe Biden
China-Taiwan Dispute Xi Jinping Warns US Joe Biden sakal
ग्लोबल

चीन-तैवान वाद : जिनपिंग यांनी अमेरिकेला बजावले; आगीशी खेळू नका

सकाळ वृत्तसेवा

बीजिंग : चीन आणि तैवान यांच्यातील वादात अमेरिकेने नाक खुपसून आगीशी खेळू नये, असे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांना बजावले. तसेच, अमेरिकेतील लोकप्रतिनिधींनीही तैवानचा दौरा करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. बायडेन यांनीही शिनजिआंग प्रांतातील नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली. ज्यो बायडेन आणि शी जिनपिंग यांच्यात आज दूरध्वनीवरून दोन तासांहून अधिक वेळ झालेल्या चर्चेनंतरही दोन देशांमधील व्यापार आणि इतर क्षेत्रांतील सहकार्यात प्रगती होण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या दोघांच्या चर्चेत तैवानचाच मुद्दा केंद्रस्थानी होता. जगातील दोन आर्थिक महासत्तांमध्ये सुरु असलेल्या वादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत असल्याचेही जिनपिंग यांनी बायडेन यांना सांगितले.

आजच्या चर्चेदरम्यान जिनपिंग यांनी कठोर शब्दांचा वापर केल्याचे सूत्रांनी सांगितले. जिनपिंग म्हणाले,‘‘आगीशी खेळणाऱ्यांना त्याचा फटका निश्‍चित बसेल. अमेरिकेला याची पूर्ण जाणीव असेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. चीनच्या स्वायत्ततेचे आणि भौगोलिक एकात्मतेचे संरक्षण करण्यास आम्ही १४० कोटी चिनी नागरिक पूर्णपणे सज्ज आहोत.’’ चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी तीन स्तरांवर संयुक्त संवाद समित्या स्थापन कराव्यात, असे आवाहनही जिनपिंग यांनी केले.

जिनपिंग यांचा इशारा

  • तैवान प्रश्‍नी अमेरिकेचा हस्तक्षेप नको

  • अमेरिकी नेत्यांनी तैवानचा दौरा करू नये

  • हस्तक्षेप झाल्यास लष्करी उपाय योजावा लागेल

  • अमेरिकेने ‘वन चायना’ धोरण मान्य करावे

इंडोनेशियामध्ये थेट भेट शक्य

बायडेन आणि जिनपिंग यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली असली तरी या दोघांमध्ये प्रत्यक्ष भेट व्हावी, यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. इंडोनेशियामध्ये नोव्हेंबर महिन्यात जी-२० देशांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी जिनपिंग यांना निमंत्रण देण्यात आले असून त्याचवेळी त्यांची बायडेन यांच्याबरोबर थेट चर्चा होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT