Hypersonic Missile esakal
ग्लोबल

चीनने केली महाविनाशकारी मिसाईलची चाचणी,अमेरिकेची चिंता वाढली

जगात दबदबा निर्माण करण्यासाठी चीनने आता अंतराळाकडे आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

जगात दबदबा निर्माण करण्यासाठी चीनने आता अंतराळाकडे आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. एका नव्या अहवालानुसार चीनने अंतराळातून नवीन हायपरसाॅनिक मिसाईलची (Hypersonic Missile) चाचणी केली आहे. यात वेगवेगळ्या सूत्रांच्या आधारे सांगितले आहे, की गेल्या ऑगस्ट महिन्यात या मिसाईलची चाचणी करण्यात आली होती. फायनान्शियल टाईम्सच्या रिपोर्टनुसार मिसाईलने पृथ्वीची खालची कक्षा किंवा लो ऑर्बिटमध्ये फेऱ्या मारल्या होत्या. मात्र आपल्या लक्ष्यापर्यंत जाण्यापासून ३२ किलोमीटर दूर राहिले. हायपरसाॅनिक मिसाईल्स (China) बनवल्यामुळे अमेरिकन गुप्तचर संस्था अस्वस्थ झाल्या आहेत. चीन व्यतिरिक्त अमेरिका, रशिया आणि कमीत-कमी पाच देश सध्या हायपरसाॅनिक तंत्रज्ञानावर काम करित आहेत. हायपरसाॅनिक मिसाईल, पारंपरिक बॅलिस्टिक मिसाईल्सप्रमाणे अणुवस्त्र घेऊन जाऊ शकतात. हायपरसाॅनिक मिसाईल हे ध्वनीच्या गतीपेक्षा पाच पटीने वेगवान असतात. दोन्हीमधील मोठा फरक म्हणजे बॅलिस्टिक मिसाईल अंतराळात उंचावर उडू शकतात.

दुसरीकडे हायपरसाॅनिक मिसाईल वातावरणात बऱ्याच कमी अंतरावरुन उडून आपल्यात लक्ष्यापर्यंत खूप वेगाने पोहोचू शकतात. हायपरसाॅनिक मिसाईल्स शोधणे आणि ती नष्ट करणे बऱ्याचदा अवघड होते. मात्र अमेरिकेसारख्या देशाने असे सिस्टम विकसित केले आहे जे क्रूज आणि बॅलिस्टिक मिसाईल्सपासून संरक्षण करु शकते. मात्र आतापर्यंत हायपरसाॅनिक मिसाईल्सवर नजर ठेवणे आणि ती नष्ट करणारे तंत्रज्ञ अद्यापही विकसित करण्यात आलेले नाही. अमेरिका व चीन यांचे संबंध तणावपूर्ण असताना हायपरसाॅनिक मिसाईल्सची चाचणी घेण्यात आली आहे. दुसरीकडे चीनने तैवानबाबत कडक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT