अमेरिकन संसदेच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी Sakal
ग्लोबल

तैवानची चीनकडून चोहोबाजूंनी कोंडी, वाचा काय आहे प्रकरण

चीनने तैवानला चोहोबाजूने घेरण्याचा प्रयत्न केला असून तैवानच्या चारही बाजूंनी नो एन्ट्री झोन घोषित केला आहे.

दत्ता लवांडे

बिजिंग : अमेरिकन संसदेच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान (Taiwan) दौऱ्यामुळे चीन आणि अमेरिका पुन्हा नव्याने आमनेसामने आले असून त्यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे. चीनने तैवानला चोहोबाजूने घेरण्याचा प्रयत्न केला असून तैवानच्या चारही बाजूंनी नो एन्ट्री झोन घोषित केला आहे. त्याचबरोबर जलमार्ग आणि हवाईमार्गांना बंदी घातली असून त्यामुळे आता नवा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान नॅन्सी पेलोसी यांनी तैवान मधून दक्षिण कोरिया साठी उड्डाण केलं आहे.

(China Taiwan Crisis)

तैवानला चोहोबाजूंनी घेरून नॅन्सी पेलोसी यांना कोरियाला जाण्यासाठी अडथळा निर्माण करण्यासाठी चीन प्रयत्न करत असून त्यामुळे आता नवा वाद उभा राहिला आहे. तैवानच्या निमित्ताने चीन आणि अमेरिकामध्ये नवा वाद निर्माण झाला असून त्यामुळे आता या दोन देशांचे संबंध बिघडण्याची शक्यता आहे.

चीनसाठी तैवान इतका का महत्त्वाचा?

  • चीन तैवानला आपला प्रांत मानतो तर तैवान स्वत:ला स्वतंत्र देश मानतो.

  • तैवान हे व्यापारी दृष्टीकोनातून महत्त्वाचा भाग असल्यामुळे चीन तैवानला आपला भाग मानतो.

  • जपान, दक्षिण कोरिया, फिलिपाईन्स या देशांना तैवानकडून तेल पुरवठा केला जातो.

  • पश्चिम आशियातून येणारी तेलाची जहाजं तैवानच्या समुद्र भागातून जातात.

  • तैवीनवर चीनने ताबा मिळवल्यास चीन आण्विक चाचण्या करण्याची भिती.

  • इतर देशांतून येणाऱ्या जहाजावर चीन कर आकारण्याची शक्यता.

  • चीन अमेरिकेच्या सहकारी देशांवरती निर्बंध लादण्याची शक्यता आहे.

  • तैवान हा एकमेव देश आहे जिथे अमेरिकन काँग्रेसने कायदा मंजूर केला आहे.

  • तैवान अडचणीत आला तर अमेरिकेने मदत करावी असा कायदा आहे.

दरम्यान, तैवान आणि चीनचा वाद जुना असून त्यामध्ये आता पुन्हा ठिणगी पडली असून या वादाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये गेल्यास अमेरिकेला त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा चीनने अमेरिकेला काल दिला होता. तत्पूर्वी नॅन्सी पेलोसी यांची तैवान दौरा रोखण्यासाठी चीनच्या शक्तीप्रदर्शन केल्याचे समोर आल्याचे वृत्त होते. त्यानंतर हा वाद टोकाला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT