China wants used cars washing machines fridges to save its economy marathi news  
ग्लोबल

China Economy : जुन्या कार, फ्रिज अन् वॉशिंग मशीनच्या मदतीने वाचणार चीनची अर्थव्यवस्था? नेमका काय आहे 'ड्रॅगन'चा प्लॅन?

China Economy : चीनची अर्थव्यवस्था कोरोना महामारीनंतर बऱ्यापैकी मोडकळीस आली आहे. यामध्ये रियल इस्टेटपासून बँकिंग सेक्टरपर्यंत सगळे सेक्टर मोठ्या संकटात सापडले आहेत.

रोहित कणसे

चीनची अर्थव्यवस्था कोरोना महामारीनंतर बऱ्यापैकी मोडकळीस आली आहे. यामध्ये रियल इस्टेटपासून बँकिंग सेक्टरपर्यंत सगळे सेक्टर मोठ्या संकटात सापडले आहेत. मात्र जानेवारी-मार्च या तिमाहीत चीनच्या जीडीपीचे आकडे काहीसे दिलासादायक आहेत. मागील काही दिवासांपासून चीनची अर्थव्यवस्था ५.३ टक्क्यांच्या दराने पुढे जात आहे.

हे आकडे आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या चीनसाठी खूप चांगले मानले जात आहेत. यामध्ये औद्योगिक उत्पादनांची प्रमुख भूमिका राहिली आहे. यासोबतच चीनमध्ये रिटेल सेलमध्ये देखील मोठी वाढ पाहायला मिळाली होती. चीनमधील रिटेल सेलमध्ये ४.७ टक्के वार्षिक वाढ झाली आहे.

आता चीनच्या अर्थव्यवस्था वाढीची गती वाढती ठेवण्यासाठी खास प्लॅन आखण्यात आला असून यासाठी जुन्या कार, जुने फ्रिज आणि जुने वॉशिंग मशीन शोधले जात आहेत. आपल्यापैकी बऱ्याच जाणांना जुन्या वस्तू आणि अर्थव्यवस्था यांचा संबंध काय? असा प्रश्न देखील पडत असेल. चीनचा अर्थव्यवस्था वाढीसाठी वापरला जात असलेला हा फॉर्म्यूला नेमका काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

चीनने आपल्या खाली जाणाऱ्या अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी आणि तीला बूस्टर मिळावा यासाठी हा नवीन फॉर्मूला वापरणे सुरू केले आहे. याअंतर्गत चीनने आता देशात औद्योगीक आणि देशांतर्गत उपकरणांचा स्टॉक अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच प्रदुषण पसरवणाऱ्या कार, मशीन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील अपग्रेड करण्याची रणनिती आखली आहे. याच्या मदतीने वापरकर्त्यांना ट्रेड-इन प्रोग्राममध्ये सहभागी करवून घेतल्याने कंपन्यांना मोठा वित्तपुरवठा होईल, ज्याच्या मदतीने देशांतर्गत वस्तूंची मागणी वाढवण्याचा चीनचा प्रयत्न आहे.

अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी ट्रेड इन योजना चार महिन्यांपूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सुरू केली होती. याचा उद्देश घरांमध्ये आणि व्यावसायांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मशीन्स अपग्रेड करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे हा आहे. चीनी सरकारचे म्हणणे आहे की यामुळे अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळेल. इतकेच नाही तर ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार ट्रेड-इन्समध्ये सध्या होत असलेल्या ग्रोथला गती देण्याची क्षमता असल्याचे सांगण्यात आले आहे.

अखेर योजना काय आहे?

जुन्या कार, वॉशिंग मशीन आणि रेफ्रिजरेटर्सवर चीनचं लक्ष का केलं आहे? तर रिपोर्टनुसार या योजनेनुसार ही उपकरणे अपग्रेड केल्याने देशात ग्राहकांचा खर्च वाढवण्यात मदत होईल. यामध्ये पेट्रोकेमिकल्स आणि स्टील सारख्या अवजड उद्योगांपासून अपार्टमेंटमध्ये नवीन लिफ्ट बसवण्यापर्यंत सर्व उद्योगांचा समावेश असणार आहे.

याशिवाय चीनच्या ट्रेड इन योजनेअंतर्गत नवीन इलेक्ट्रिक वाहने तसेच इंधनाची बचत करणाऱ्या कार्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सबसिडी देण्याची योजना देखील प्रस्तावीत आहे. अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळावा यासाठी चीनकडून ही योजना राबवली जात आहे. दरम्यान या फॉर्म्यूल्याअंतर्गत उपकरणे अपग्रेड करण्याचा सर्व खर्च प्रादेशिक सरकारे उचलणार आहेत. तसेच याअंतर्गत उद्योगांना सब्सिडी, टॅक्समध्ये सूट आणि स्वस्त दराने कर्ज देण्याची सुविधा देखील दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT