ग्लोबल

चायना का माल है यह! चीनची लस प्रभावी नसल्याचा अभ्यासातून दावा

सकाळ डिजिटल टीम

बुडापेस्ट : जगभरात सध्या कोरोनाच्या संकटाने थैमान घातलं आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गावर अद्याप कोणतंही प्रभावी औषध उपलब्ध झालं नाहीये. मात्र, अनेक देशांनी आपापल्या लशी उपलब्ध केल्या आहेत. यातील अनेक लशी या प्रभावी आहेत. लशींच्या या प्रभावी असण्याबद्दल अनेक अभ्यास सध्या सुरु आहेत. चीनने विकसित केलेल्या लशीबाबत देखील सध्या अनेक अभ्यास सुरु आहेत. चीनने विकसीत केलेली सिनोफार्म ही कोरोना प्रतिबंधक लस ही फारशी प्रभावी ठरत नसल्याचे एका अभ्यासातून उघड झाले आहे. यामुळे ज्या देशांमध्ये या लशीचा वापर करून लसीकरण मोहिम राबविली गेली आहे, त्याठिकाणच्या जनतेच्या आरोग्याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हंगेरीमध्ये याबाबतचा अभ्यास करण्यात आला. सिनोफार्म लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी विविध वयोगटातील ४५० जणांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. यानुसार, वयाच्या पन्नाशीच्या आतीत नागरिकांना लशीमुळे ९० टक्के संरक्षण मिळते. मात्र, त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना लस देताना प्रभाव कमी होत असल्याचेही आढळून आले आहे. ८० वर्षांपुढील नागरिकांमध्ये तर लस केवळ ५० टक्केच प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे. हा अहवाल ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आला असून अद्याप इतर शास्त्रज्ञांनी त्याला मान्यता दिलेली नाही. चीनच्या आरोग्य यंत्रणेने या अहवालावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

या अभ्यासाशी संबंधित नसलेल्या हाँगकाँग युनिव्हर्सिटीच्या व्हायरोलॉजिस्ट जिन डोंग-यान यांनी म्हटलंय की, ही लस घेतल्यानंतर अत्यधिक जोखीम असलेल्या लोकांना या विषाणूंचा प्रतिकार कमी होतो, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT