Chinas defense sakal
ग्लोबल

China Budget : चीनचा संरक्षण अर्थसंकल्प भारताच्या तिप्पट

अमेरिका, भारत, फिलिपिन्स आणि तैवान या देशांबरोबर तणावपूर्ण संबंध लक्षात घेऊन अर्थव्यवस्था मंदावली असतानाही चीनने यंदाही संरक्षण विभागाच्या वार्षिक अर्थसंकल्पात वाढ केली आहे.

वृत्तसंस्था

बीजिंग - अमेरिका, भारत, फिलिपिन्स आणि तैवान या देशांबरोबर तणावपूर्ण संबंध लक्षात घेऊन अर्थव्यवस्था मंदावली असतानाही चीनने यंदाही संरक्षण विभागाच्या वार्षिक अर्थसंकल्पात वाढ केली आहे. चीनने सलग तिसऱ्या वर्षी संरक्षण खर्चात सात टक्क्यांनी वाढ केली आहे. भारताच्या संरक्षण खर्चापेक्षा ही वाढ तिप्पट असून अमेरिकेच्या संरक्षण अर्थसंकल्पापेक्षा खूप कमी आहे.

चीनने २०२४ च्या संरक्षण अर्थसंकल्पात ७.२ टक्के वाढ केली आहे. तो आता २३० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. भारताची संरक्षणविषयक तरतूद ७५ अब्ज डॉलर आहे. चीनच्या तुलनेत हा खर्च तिपटीने कमी आहे. अमेरिकेच्या भारत- प्रशांत क्षेत्राविषयक समितीच्या विश्‍लेषणानुसार चीनसाठी २०२७ वर्ष अत्यंत महत्त्वाचे असेल.

त्या वर्षात ‘द पीपल्स लिबरेशन आर्मी’ (पीएलए) या चिनी सैन्यदलाला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. तसेच तोपर्यंत सैन्याच्या बळावर तैवान ताब्यात घेण्याचा अध्यक्ष शी जिनपिंग यांचा प्रयत्न असेल. चीनची आण्विक शक्ती आणि पारंपरिक सैन्यात जलद सुधारणा करण्यावर ‘पीएलए’चा भर आहे.

हिंद महासागरात जहाजे तैनात करून भारत-प्रशांत क्षेत्रावर सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न ‘पीएलए’ करीत असून जपानने चीनला अटकाव केला नाही तर दक्षिण चिनी समुद्रात चीन सागरी आणि क्षेपणास्त्र शक्ती अधिक मजबूत करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

तैवानवर लक्ष

चीनच्या एका सरकारी अहवालानुसार तैवानमुळे संरक्षण खर्चावर वाढ करण्यात आली आहे. हा अहवाल चीनचे पंतप्रधान ली किआंग यांनी मंगळवारी नॅशनल पीपल्स काँग्रेस या चिनी संसदेत सादर केला. चीनच्या या संरक्षण अर्थसंकल्पावर भारतासह तैवान, जपान, फिलिपिन्ससह अमेरिकेचेही लक्ष होते. अमेरिकेनंतर चीनचा सैन्यदलावरील खर्च सर्वाधिक असल्याने संरक्षण क्षेत्रात या दोन देशांमध्ये जणू स्पर्धा लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT