China  sakal
ग्लोबल

China : चीनमध्ये खासगी कंपनीचे रॉकेट कोसळले;अवकाश कार्यक्रमाला धक्का,उड्डाणानंतर काही क्षणातच आग

चीनच्या अवकाश कार्यक्रमाला रविवारी धक्का बसला. चीनच्या स्पेस पायोनियर या खासगी कंपनीचे ‘तियानलाँग-३’ रॉकेट चाचणीदरम्यान कोसळले. सुदैवाने संबंधित भागातील नागरिकांना अगोदरच सुरक्षित ठिकाणी नेण्यात आल्याने कोणतिही हानी झाली नाही.

सकाळ वृत्तसेवा

बीजिंग : चीनच्या अवकाश कार्यक्रमाला रविवारी धक्का बसला. चीनच्या स्पेस पायोनियर या खासगी कंपनीचे ‘तियानलाँग-३’ रॉकेट चाचणीदरम्यान कोसळले. सुदैवाने संबंधित भागातील नागरिकांना अगोदरच सुरक्षित ठिकाणी नेण्यात आल्याने कोणतिही हानी झाली नाही.

तियानलाँग लाँचपॅडपासून वेगळे झाले पण काही अंतरावर वरच्या दिशेने नेणाऱ्या यंत्रणेत दोष झाला. परिणामी दुसऱ्या टप्प्याऐवजी पहिल्याच टप्प्यात त्याचा भाग वेगळा झाला आणि आग लागली. पेटलेले रॉकेट गोंगयी शहरातील पर्वतीय भागात कोसळले. जळत्या रॉकेटचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या रॉकेटच्या आराखड्यातील सदोषामुळे ते कोसळले, असे कंपनीने नमूद केले. ग्राउंड टेस्टच्या वेळी रॉकेट आणि चाचणी तळ यांच्यातील कनेक्शन योग्यरीत्या प्रस्थापित झाले नाही आणि ते लाँचपॅडवरच वेगळे झाले होते, असे कंपनीने म्हटले आहे.

अपघातग्रस्त तियानलाँग-३ हे एक मोठे वाहक रॉकेट असून त्याला चीनच्या सॅटेलाइट इंटरनेट नेटवर्कच्या निर्मितीत मदत करण्यासाठी तयार केले होते. या अपयशामुळे चीनच्या अवकाश कार्यक्रमाला धक्का बसला आहे.

दोन टप्प्यात कार्यान्वित होणारे तियानलाँग-३ आणि स्काय ड्रॅगन-३ रॉकेट हे काही प्रमाणात पुन्हा वापरता येऊ शकते. प्रक्षेपणानंतर रॉकेटचा ढिगारा पडणे नवीन गोष्ट नाही, मात्र निर्मितीच्या अवस्थेत असणाऱ्या रॉकेटने अनियोजितपणे उड्डाण घेणे आणि चाचणीच्या ठिकाणाजवळ पडणे ही दुर्मिळ घटना आहे.

तियानलोंग-३चा पहिल्या टप्प्यांतील उष्णता निर्माण होण्याची प्रक्रिया सामान्य झाली, मात्र रचनेतील दोषामुळे रॉकेट या टप्प्यातच सांगड्यापासून वेगळे झाले. एक रॉकेटमध्ये अनेक टप्पे राहू शकतात. तियानलाँग-३ दोन टप्प्यांत उड्डाण घेणारे रॉकेट ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियातही एका रॉकेट उड्डाणानंतर लगेचच पेटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT