बिजिंग - चिनी कम्युनिस्ट पक्षाचे नेतृत्व आणि देशातील समाजवादी राजकीय व्यवस्थेने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली असून आम्ही कोणत्याही संकटावर मात करू शकतो हे सिद्ध करून दाखविले असल्याचे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे.
अवघे जग हे कोरोनाच्या संसर्गासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाला जबाबदार ठरवीत असताना त्यांनी मात्र पक्षाच्या धोरणांचे आज जोरदार समर्थन केले आहे. अमेरिकेने कोरोनाच्या संसर्गाचे खापर चीनवर फोडले असून वुहानमधील विषाणू विज्ञान संस्था या संसर्गाचे मूळ केंद्रस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला.
अन्य पक्षांशी संवाद
चीनने महिनाभरात कोरोनाचा संसर्ग रोखला आणि या संसर्गाच्या उद्रेकाचा केंद्रबिंदू असलेल्या वुहानमधील स्थिती तीन महिन्यांत नियंत्रणात आणली असे जिनपिंग यांनी स्पष्ट केले. चीनमध्ये सत्तेत नसलेल्या अन्य डाव्या पक्षांशी जिनपिंग यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत त्यांची मते आणि सूचना जाणून घेतल्या.
जिनपिंग यांचा दावा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.