Lucky Draw Jackpot Sakal
ग्लोबल

Lucky Draw Jackpot: कर्मचारी जोमात, बॉस कोमात! लकी ड्रॉमध्ये कर्मचाऱ्याने जिंकली 365 दिवसांची पगारी सुट्टी

कंपनीने काढलेल्या लकी ड्रॉमध्ये कर्मचाऱ्याने एक वर्षाची पगारी सुट्टी जिंकली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Lucky Draw Jackpot: ऑफिसमधील कामासोबतच लोकांना सुट्टीही हवी असते. यामुळे मनाला आणि मेंदूला आराम मिळतो, त्यामुळे काम करायला मजा येते. असे अनेक अहवाल आहेत, ज्यात असे म्हटले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती सुट्टीनंतर ऑफिसमध्ये येते तेव्हा त्याची क्षमता वाढते, म्हणजेच तो चांगले काम करतो.

प्रत्येक कार्यालयात कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुटी दिली जाते, पण त्याशिवाय वर्षभरात अनेक सुट्ट्या असतात, त्याही ते घेऊ शकतात. बर्‍याच कंपन्यांमध्ये कर्मचार्‍यांना त्यांची सुट्टी घेण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो.

परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चीनमधील एका व्यक्तीला ऑफिसमधून 365 दिवसांची सुट्टी मिळाली आहे आणि तीही पगारी सुट्टी. कंपनीने काढलेल्या लकी ड्रॉमध्ये कर्मचाऱ्याने एक वर्षाची पगारी सुट्टी जिंकली आहे.

म्हणजेच कर्मचारी वर्षभर रजेवर असेल आणि या काळात त्याला कंपनीकडून पूर्ण पगारही मिळेल. टुडे ऑनलाइनच्या वृत्तानुसार, कंपनीने चीनच्या शेनझेन शहरात 9 एप्रिल रोजी वार्षिक कार्यक्रमा दरम्यान हा लकी ड्रॉ आयोजित केला होता.

या लकी ड्रॉचा एक व्हिडिओही चिनी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये कर्मचारी बक्षीस म्हणून चेक घेताना दिसत आहे, ज्यामध्ये पैशांऐवजी एक वर्षाची पगारी रजा लिहिलेली आहे.

लकी ड्रॉमध्ये कर्मचाऱ्यांना बक्षिसे तसेच काही दंडांचा समावेश होता. प्रत्येकाला वेटर म्हणून ड्रिंक्स देणे इत्यादी शिक्षेचा या दंडांतर्गत समावेश होता.

मात्र, त्यात वर्षभराच्या पगारी रजेचाही समावेश होता. कंपनीचा असा विश्वास होता की हे बक्षीस प्रत्यक्षात कोणीही जिंकण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

अहवालानुसार, कंपनीने कोरोना नंतर सुमारे 3 वर्षांमध्ये प्रथमच कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणे हा या लकी ड्रॉचा मुख्य उद्देश होता. चेन नावाच्या कंपनीच्या प्रशासकीय कर्मचाऱ्याने सांगितले की, अशा प्रकारचा लकी ड्रॉ जिंकल्याचे पाहून त्याच्या बॉससह सर्वांनाच धक्का बसला.

कंपनीचे कर्मचारी म्हणाले, "हे बक्षीस कुणाच्या खात्यात जाईल, असे आम्हाला कधीच वाटले नव्हते."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT