hacking 
ग्लोबल

चीनी हॅकर ग्रुप डिप पांडा पुन्हा सक्रिय; भारतासहित जगाला बनवलं होतं लक्ष्य

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : डिप पांडा नावाने ओळखला जाणारा चीनी हॅकर ग्रुप आता पुन्हा एकदा सक्रिय झाला असल्याची माहिती एका रिपोर्टने दिली आहे. काही वर्षांपूर्वीच या हॅकर ग्रुपने भारतासहित इतर अनेक जागतिक संस्थांवर हल्ला केला होता. त्यानंतर बेपत्ता झालेला हा हॅकर्स ग्रुप आता पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डिप पांडाने गेल्या महिन्यापासून इकॉनॉमिक सेक्टर, ट्रॅव्हलिंग सेक्टर आणि कॉस्मेटिक सेक्टरमधील उद्योगांविरोधात नवे हल्ले सुरु केले आहेत. डिप पांडाने नव्या फायर चिली रुटकिटला तैनात करण्यासाठी Log4Shell ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा फायदा घेत हे सायबर हल्ले केले आहेत.

गेल्या महिन्यामध्ये, फोर्टीगार्ड लॅब्सच्या संशोधकांनी एका चायनिज एडवान्स्ड पर्सिस्टंट थ्रीट हॅकिंग ग्रुपद्वारे एका मोहिमेचा शोध घेतला होता, जो कमीतकमी एका दशकापासून सक्रिय आहे. हा समूह डेटा चोरी आणि पाळत ठेवण्यासाठी सरकार, संरक्षण, आरोग्य सेवा, दूरसंचार आणि आर्थिक संघटनांना लक्ष्य करत आहे.

रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बॅकडोअर फॉरेन्सिक लीडनंतर, आम्हाला चोरीच्या डिजिटल प्रमाणपत्रासह स्वाक्षरी केलेले नोवेल कर्नल रूटकिट सापडले, असे संशोधकांनी ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलंय. आम्हाला आढळलं की, हेच प्रमाणपत्र विंटी नावाच्या दुसर्‍या चीनी APT गटाने त्यांच्या काही साधनांवर स्वाक्षरी करण्यासाठी देखील वापरले होते.

त्यामुळे हा हॅकिंगचा ग्रुप अजूनही सक्रिय असल्याचंच दिसून येत आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. एकीकडे भारत आणि चीन दरम्यान सीमा तणाव वाढलेला आहे. चीनच्या सायबर सुरक्षा संशोधकांनी गेल्या वर्षी भारताच्या पॉवर ग्रिडसह गंभीर पायाभूत सुविधांविरोधातच एक मोहीम उघडली होती. मे 2020 मध्ये दोन्ही देशांमध्ये झालेल्या सीमेवरील संघर्षामध्ये एकूण 12 फर्म्सना लक्ष्य केलं होतं. यामध्ये 10 वीज उत्पादन केंद्रांना लक्ष केलं होतं. त्या पार्श्वभूमीर डिप पांडाने पुन्हा सक्रिय होणं चिंताजनक मानलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या तयारीसाठी आज जालन्यात मराठा समाजाची महत्वाची बैठक

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT