चिनी विमानांची तैवानमध्ये पुन्हा घुसखोरी! प्रत्युत्तरानंतर काढला पळ esakal
ग्लोबल

चिनी विमानांची तैवानमध्ये पुन्हा घुसखोरी! प्रत्युत्तरानंतर काढला पळ

चिनी विमानांची तैवानमध्ये पुन्हा घुसखोरी! प्रत्युत्तरानंतर काढला पळ

सकाळ वृत्तसेवा

तैवानकडे डोळे लावून बसलेल्या ड्रॅगनने पुन्हा एकदा कंबर कसली आहे आणि आपली चार लष्करी विमाने तैवानला पाठवली.

एकीकडे ओमिक्रॉनसारख्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची चिंता जगाला लागलेली असताना चीनच्या मात्र कमकुवत देशांना धमकावण्याच्या कारवाया सुरू आहेत. आपल्यापेक्षा कमकुवत देशाला धमकावणारा चीन (China) आपल्या कारवायांना आवर घालत नाही. तैवानकडे (Taiwan) डोळे लावून बसलेल्या ड्रॅगनने (Dragon) पुन्हा एकदा कंबर कसली आहे आणि आपली चार लष्करी विमाने (Military aircraft) तैवानला पाठवली. सोमवारी, बीजिंगकडून (Beijing) वाढत्या लष्करी धोक्‍यांचे आणखी एक उदाहरण दिसून आले जेव्हा चार चिनी लष्करी विमानांनी तैवानच्या एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन (Air Defense Identification Zone)(एडीआयझेड) मध्ये प्रवेश केला. मात्र, तैवान प्रत्युत्तर दिल्यानंतर चिनी विमानांनी पळ काढला. चीनकडून या महिन्यातील तैवानमधील ही पाचवी घुसखोरी आहे.

तैवान न्यूजच्या वृत्तानुसार, पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सची (People's Liberation Army Air Force) दोन शेनयांग J-11 लढाऊ विमाने, एक शानक्‍सी Y-8 पाणबुडीरोधक युद्ध विमान आणि एक शानक्‍सी Y-8 टोही विमान तैवानच्या हवाई क्षेत्राच्या नैऋत्य कोपऱ्यात धडकले. मात्र, प्रत्युत्तरात तैवाननेही आपली लढाऊ विमाने पाठवली. तैवानच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाने नोंदवले की, तैवानने बीजिंगच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून विमान पाठवले आणि रेडिओ अलर्ट जारी केला. चिनी विमानांचा मागोवा घेण्यासाठी हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली तैनात केली.

येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे, की या महिन्यात 13 चिनी लष्करी विमानांनी तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रात घुसखोरी केली आहे, ज्यात सात स्पॉटर विमाने आणि सहा लढाऊ विमानांचा समावेश आहे. चीन बीजिंग या लोकशाही बेटावर म्हणजेच तैवानवर आपल्या सार्वभौमत्वाचा दावा करत आहे आणि या कारणास्तव त्यांनी तैवानमध्ये लष्करी घुसखोरी वाढवली आहे.

चीनच्या आग्नेय किनाऱ्यावर असलेला तैवान हा सुमारे 24 दशलक्ष लोकसंख्येचा लोकशाही देश आहे. सात दशकांहून अधिक काळ स्वतंत्रपणे राज्य करूनही चीनने तैवानचे स्वातंत्र्य म्हणजे युद्ध अशी धमकी दिली आहे. यामुळेच 1 जून रोजी चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी तैवानचे चीनमध्ये विलिनीकरण करण्याचा संकल्प केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात बीडमध्ये भाजपा आक्रमक, सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून भाजपाने आंदोलन

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT